Catch the Rain campaign : आता BMC पावसाचं पाणी मोजण्यासह झेलणारही, केंद्राची ही योजना करणार लागू

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 05, 2022 | 15:13 IST

दिवसेंदिवस शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील (BJP) सत्तासंघर्ष तीव्र होत आहे. शिवसेना राज्यातील विरोधी पक्ष ते केंद्रातील (Central Government) सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपशी नेहमी दोन हात करण्यास तयार असतं.

Now BMC will Catch the Rain water
शिवसेनेची योजना ठरली फेल; मोदी सरकारची ही योजना करणार लागू   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेन वॉटर हार्वेस्टींग योजना हे अभियान 2007 मध्ये शिवसेनेनं मुंबईत सुरू केलं होतं.
  • मुंबईमधील 1200 उद्यानांमध्येही रेन वॉटर हार्वेस्टिंग संकल्पना अपयशी

Catch the Rain campaign : मुंबई :  दिवसेंदिवस शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील (BJP) सत्तासंघर्ष तीव्र होत आहे. शिवसेना राज्यातील विरोधी पक्ष ते केंद्रातील (Central Government) सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपशी नेहमी दोन हात करण्यास तयार असतं. अशात मुंबई महापालिकेत (Mumbai Municipal Corporation) प्रशासक लागू झाल्यानंतर शिवसेनेच्या योजनेऐवजी केंद्र सरकारची योजना लागू होणार आहे. या अभियानाने बीएमसी पावसाचं पाणी झेलणार आहे.

परंतु ज्या पालिकेला पाणी साठवता आले नाही त्या पालिकेला पावसाचं पाणी झेलता येईल का याबाबत जर शंका आहे. 
दरम्यान, शिवसेनेने लागू केलेली पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण योजना म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टींग योजना.  2007 मध्ये शिवसेनेनं मुंबईत हे अभियान सुरू केले होते. मात्र ही योजना अपयशी ठरल्यानंतर आता बीएमसी प्रशासनाने केंद्र सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेलं 'कॅच दि रेन' अभियान सुरू करायचं ठरवलं आहे. 

रेन वॉटर हार्वेस्टींग योजना का अपयशी ठरली? 

मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी सातत्यानं कमी पावसामुळे पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी शिवसेनेनं 2007 मध्ये मुंबईत 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही योजना राबविण्यात पालिका प्रशासनाला अपयश आलं. मुंबईमध्ये नवीन बांधकाम होणाऱ्या इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं बंधनकारक केलं होतं. मात्र, गेल्या 15 वर्षात रेन वॉटर हार्वेस्टिंगची योग्य प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. 

ही योजना राबवण्यात यावी यासाठी माजी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागात तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, परदेशी यांच्यानंतर दोन पालिका आयुक्त बदलले तरीही हा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.  2012 मध्ये तत्कालीन माहापौर सुनिल प्रभू यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. गेल्या 10 वर्षातही श्वेतपत्रिकाही समोर आलेली नाही. मुंबईमधील 1200 उद्यानांमध्येही रेन वॉटर हार्वेस्टिंग  संकल्पना यशस्वीपणे राबवता आलेली नाही. 

 'कॅच द रेन' अभियान

मुंबईत पावसाळ्यात 4 महिने पाऊस पडत असतो. पावसाळा संपल्यावर 8 महिने पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत कालावधीत पाण्याची मागणी पूर्ण होणे आवश्यक असते. यासाठी जलशक्ती अभियानात 'कॅच द रेन'साठी पुढाकार घेतला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी