आता T-20 क्रिकेट सामन्यासह 'अमेट्रिन24' मध्ये घ्या मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद 

टी २० चे सामने पाहायला बार, पब, रेस्टॉरंटमध्ये जाण्याची इच्छा नाहीये आणि दुसरा पर्याय शोधत आहात.

Now enjoy a T-20 cricket match at 'Ametrin24' with a taste of Maratha food
आता T-20 क्रिकेट सामन्यासह 'अमेट्रिन24' मध्ये घ्या मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टी २० चे सामने पाहायला बार, पब, रेस्टॉरंटमध्ये जाण्याची इच्छा नाहीये आणि दुसरा पर्याय शोधत आहात.
  • तुमच्यासाठी नवीन पर्याय सध्या मुंबईत उपलब्ध आहे.
  • अगदी मराठमोळ्या जेवणासह मराठमोळ्या अंदाजात तुम्ही टी २० चे सामन्यांचा आंनद घेऊ शकतात.

टी २० चे सामने पाहायला बार, पब, रेस्टॉरंटमध्ये जाण्याची इच्छा नाहीये आणि दुसरा पर्याय शोधत आहात. तर तुमच्यासाठी नवीन पर्याय सध्या मुंबईत उपलब्ध आहे. अगदी मराठमोळ्या जेवणासह मराठमोळ्या अंदाजात तुम्ही टी २० चे सामन्यांचा आंनद घेऊ शकतात.

मुंबईतील अंधेरी पश्चिम, विरा देसाई रोडवरील 'अमेट्रिन24' या हॉटेलची सध्या जोरदार चर्चा आहे. आणि असणार पण का नाही. मराठमोळ्या जेवणाचा ऐन दिवाळीत आनंद मुंबईकरांना घ्यायला मिळतोय. आणि त्यासोबत टी २० मॅचेसचे सामने... दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या हॉटेलमधील मराठमोळा एम्बियन्स मुंबईकरांना आकर्षित करत आहे. 


या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला मराठमोळ्या पद्धतीने फेटे घातले जात आहेत. एवढचं नाही तर , तुतारी वाजवून येणा-या ग्राहकांचे स्वागत केले जाते. तर हॉटेलमधील वाढप्यांचा पेहरावही मराठी आहे. मराठी संस्कृती, भाषा, इतिहास हा सर्वांपर्यंत पोहचावा यासाठी हॉटेल मालकांचे प्रयत्न आहेत. तसचं त्या अनुषंगाने हॉटेलमध्ये तशी विविध कलाकृती केलेली आहे. सध्या क्रिकेट मॅट बघायची असेल तर बार, पब, मोठमोठे रेस्टॉरंट शिवाय इतर पर्याय पहायला मिळत नाही. अशात 'अमेट्रिन24' संपूर्ण कुटुंबासाठी आणि मित्र मैत्रिणीसाठी ऐन दिवाळीत हा पर्याय उपलब्ध केल्याने मुंबईकरांना एक वेगळा अनुभव अनुभवायला मिळत आहे. 

महाराष्ट्रातील गड किल्ले हे शौर्याच प्रतिक मानले जाते. हीच पंरपरा राखत दिवाळीत असे किल्ले सर्वत्र बांधत परंपरा व संस्कृती जपली जाते. दिवाळीत मातीचे गड आणि किल्ले लहान मुले बनवतात. हीच परंपरा या हॉटेलमध्येही बघायला मिळते. हॉटेलमद्येही रायगड या किल्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तसेच मराठ मोळ्या पदार्थांची मेजवानी आहेच, दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत. अशात घराबाहेर पडल्यावर मराठमोळ्या पदार्थांसह टी 20 क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी हा पर्याय उत्कृष्ट असल्याचे मुंबईकरांच्या प्रतिक्रिया आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी