Now every Wednesday will be a no honking day in Mumbai : मुंबई : मुंबईत आजपासून दर बुधवारी 'नो हाँकिंग डे' साजरा होणार आहे. 'नो हाँकिंग' म्हणजे विनाकारण हॉर्न न वाजविणे तसेच विनाकारण हॉर्न वाजवू नये म्हणून जनजागृती करणे.
आज बुधवार १ जून २०२२ पासून दर बुधवारी 'नो हाँकिंग' साजरा होणार आहे. वाहतूक पोलीस विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत. कारवाई करण्याव्यतिरिक्त वाहतूक पोलीस विनाकारण हॉर्न वाजवू नये म्हणून जनजागृती करणार आहेत.
मुंबईत वाहतूक पोलिसांनी 'नो हाँकिंग' हे विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदुषणामुळे होणारे त्रास तसेच विनाकारण हॉर्न वाजविणे टाळल्यास होणारे फायदे याबाबत वाहतूक पोलीस जनजागृती करणार आहेत. जनजागृतीसाठी फलक, बॅनर तयार करण्यात आले आहेत. प्रमुख रस्ते आणि जिथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते अशा ठिकाणी फलक आणि बॅनर लावून जनजागृती केली जाईल. तपासणी किंवा कारवाईसाठी थांबविलेल्या वाहनाच्या चालकाशी संवाद साधून वाहतूक पोलीस संबंधित चालकांनाही विनाकारण हॉर्न वाजविणे टाळणे कसे हिताचे आहे ते समजावून सांगतील.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.