आबा अन् तात्यालाही सांगता येणार पत्ता; राज्यातील दुकानांवरील पाट्या राहणार मराठीत

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 13, 2022 | 12:07 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) बुधवारी झाली असून या बैठकीत राज्याच्या हिताचे ९ महत्त्वाचे निर्णय झाले.

Now Shps Bord will in Marathi Decision take in Cabinet meeting
सर्व दुकानाच्या पाट्या असणार मायबोली मराठीत   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत.
  • मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत,

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनाच्या (Government of Maharashtra) मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) बुधवारी झाली असून या बैठकीत राज्याच्या हिताचे ९ महत्त्वाचे निर्णय झाले. यातील सर्वात महत्त्वाचे निर्णय होता तो म्हणजे दुकानावरील वाढलेल्या अमराठी भाषेच्या पाट्या. राज्यातील (State) दुकानावर (Shops) आता मराठी भाषेत असाव्यात असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान दुकानांच्या पाट्या हे मराठीत असावेत यासाठी राज ठाकरे यांचा पक्ष मनसे नेहमी आक्रमक राहिलेला आहे. जे दुकानदार फलक मराठीत लावत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील पक्षाकडून करण्यात येत होती. 

दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती.आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली. राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी मंत्रालयात संबंधितांची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतला.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी