SSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; आता होणार फक्त HSC चीच होणार बोर्ड परीक्षा

Board Exam : या नव्या शैक्षणिक धोरणानुसार बोर्डाची परीक्षा कुठली, हा प्रश्न अनेक दिवस अनुत्तरित आहे. मात्र, आता अकरावी बोर्ड करावे लागणार असताना, बारावी बोर्डाची परीक्षा जाहीर झाली आहे.

Now the board will be only for HSC and not SSC
SSCच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; आता होणार फक्त HSC चीच होणार बोर्ड परिक्षा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नवीन शैक्षणिक धोरण हे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू
  • प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार
  • बारावीस्तरावर बोर्ड परीक्षा होणार आहे.

मुंबई : नवीन शैक्षणिक धोरण हे २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. त्यामुळे इयत्ता दहावीचे बोर्ड रद्द करून अकरावीला बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती; मात्र आता ती बदलून बारावीला बोर्ड परीक्षा करण्यात आली आहे. (Now the board will be only for HSC and not SSC)

अधिक वाचा : कोणी बायको देता का बायको..!, लग्नास इच्छुक वरांची घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढली वरात

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवीचा पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा असणार आहे. पूर्वी तो पहिली ते चौथी असायचा. त्याच्यात एक वर्ष वाढवले असून त्यानंतरचा दुसरा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये सहावी ते आठवी या ३ वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो पाचवी ते सातवी असा टप्पा होता. त्यामध्ये माध्यमिककडून आठवी काढून ती प्राथमिकला दहावीऐवजी आता बारावी बोर्ड होणार जोडण्यात आली आहे.

अधिक वाचा : ....तर कोयनेचे पाणी सोडणार नाही, देसाईंचे कर्नाटकच्या मुख्यमत्र्यांना प्रत्युत्तर

त्यानंतरचा टप्पा माध्यमिकचा असणार असून, तो इयत्ता नववी ते अकरावी असा राहणार आहे. पूर्वी तो आठवी ते दहावी असा होता आणि दहावीला बोर्डाची परीक्षा होती. आता शेवटच्या वर्षी अठवी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य असताना बारावीच्या स्तरावर बोर्डाची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार आहेत. त्यामुळे उच्च माध्यमिकचा टप्पा जवळपास निकाली निघाला आहे.

 ५+३+३+४ असा एकूण १५ वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये इयत्ता तिसरी इयत्ता आठवी इयत्ता आठवी इयत्ता ते अकरावी या स्तरावर क्षमता परीक्षा घेण्यात येतील. पदवीच्या चार वर्षांमध्ये पहिल्या वर्षी प्रमाणपत्र, दुसऱ्या वर्षानंतर प्रगत पदविका, तिसऱ्या वर्षानंतर बॅचलर डिग्री आणि चौऱ्या वर्षानंतर बॅचलर विथ रिसर्च अशी प्रमाणपत्रे दिली जातील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी