दिवाळीच्या दिवशीही सुटी न घेता काम करणार अधिकारी कर्मचारी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 25, 2022 | 20:28 IST

Officers will work without taking leave even on Diwali : प्रत्येकाला घरच्यांसोबत दिवाळी आनंदात साजरी करणे आवडते. पण मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी दिवाळीत सुटी न घेता निवडणुकीचे काम करणार आहेत. 

Officers will work without taking leave even on Diwali
दिवाळीच्या दिवशीही सुटी न घेता काम करणार अधिकारी कर्मचारी  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • दिवाळीच्या दिवशीही सुटी न घेता काम करणार अधिकारी कर्मचारी
  • मुंबई उपनगर जिल्ह्यातील 166 – अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार
  • मतमोजणी रविवार 6 नोव्हेंबर 2022 रोजी होईल

Officers will work without taking leave even on Diwali : प्रत्येकाला घरच्यांसोबत दिवाळी आनंदात साजरी करणे आवडते. पण मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कार्यरत असणारे अधिकारी कर्मचारी दिवाळीत सुटी न घेता निवडणुकीचे काम करणार आहेत. 

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 166 – अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. मतमोजणी रविवार 6 नोव्हेंबर 2022 रोजी होईल. या निवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात 2 लाख 71 हजार 502 पात्र मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे ‘मायक्रो ऑब्जरव्हर’ यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे 2 हजार 500 कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे.

सौदीचे राजे नोव्हेंबरमध्ये करणार भारत दौरा

UK : अरे एक तर एकत्र रहा नाही तर..., पंतप्रधान होताच ऋषी सुनक यांनी खासदारांना दिला इशारा

निवडणूक विषयक विविध स्तरीय प्रक्रिया पार पाडण्याकरिता यंदाच्या पोटनिवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, म्हाडा, महावितरण, कामगार आयुक्तालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य शासनाचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक विविध बाबी व प्रक्रिया करण्यासाठी असलेला कालावधी पुरेसा आहे. मात्र, असे असले तरी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचारी हे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी देखील कार्यरत राहून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देत यंदाची दिवाळी एका वेगळ्या अर्थाने अधिकाधिक प्रकाशमय करणार आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत मतदान करण्यासाठी गुरुवार 3 नोव्हेंबर 2022 मतदारसंघातील मतदारांकरिता सुटी जाहीर करण्यात आली आहे. मतदान करता यावे यासाठी ही सुटी देण्यात आली आहे. नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी