Omicron Crisis : ओमायक्रॉनचे संकट वाढणार; रुग्णसंख्या पोहचली 41 वर, एकट्या महाराष्ट्रात निम्मी प्रकरणे

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 14, 2021 | 12:56 IST

Omicron  Crisis : महाराष्ट्रात (Maharashtra) सोमवारी (Monday) कोविड-19 (COVID-19)च्या ओमिक्रॉन स्ट्रेनचे (Omicron strain) आणखी दोन रुग्ण आढळले, त्यानंतर ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची (Patient) संख्या 41 वर पोहोचली आहे.

Omicron  Crisis
ओमायक्रॉनचे संकट: एकट्या महाराष्ट्रात 20 जणांना लागण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्लीमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध लादले जाऊ शकतात.
  • देशभरात ओमायक्रॉनचे 41 रुग्ण आढळून आले आहेत.
  • महाराष्ट्रात 20 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

Omicron  Crisis : New Delhi नवी दिल्ली : महाराष्ट्रात (Maharashtra) सोमवारी (Monday) कोविड-19 (COVID-19)च्या ओमिक्रॉन स्ट्रेनचे (Omicron strain) आणखी दोन रुग्ण आढळले, त्यानंतर ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची (Patient) संख्या 41 वर पोहोचली आहे. लातूर (Latur) आणि पुणे जिल्ह्यात (Pune district) ही दोन नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रात ओमिक्रॉनची एकूण प्रकरणे 20 झाली आहेत. एकट्या महाराष्ट्रात 20 रुग्ण आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron variant) देशातील निम्मी प्रकरणे महाराष्ट्रातच आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात आता ओमायक्रॉनचे संकट वाढणार का, अशी भीती व्यक्त होत आहे. 

सोमवारी पुण्यात 39 वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, लातूरमधील रुग्ण हा 33 वर्षांचा पुरुष आहे. दोघांचेही लसीकरण पूर्ण झाले होते. त्यांनी दुबई प्रवास केला होता. दरम्यान, राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 569 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत मुंबई 174, पुणे जिल्हा 132, मराठवाडा 46, विदर्भात आठ नवे कोरोनारुग्ण आढळले. दरम्यान, दुसरीकडे दुसऱ्या लाटेत करोनाची स्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला आहे. याविषयी उच्च न्यायालयाने राज्य सरकारची पाठ थोपटली होती. 

सध्या देशातील ओमायक्रॉनच्या एकूण 40 रुग्णांपैकी 20 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. तर राजस्थानमध्ये आतापर्यंत 9 प्रकरणे आढळून आली आहेत. याशिवाय कर्नाटक आणि गुजरातमध्ये 3-3 प्रकरणे आहेत. याशिवाय केरळ, आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. राजधानी दिल्लीत सध्या ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, चीनने सोमवारी उत्तरेकडील तियानजिन शहरात ओमिक्रॉन स्ट्रेनची आढळल्याची पुष्टी केली आहे. युकेचे (ब्रिटनचे) पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील ओमिक्रॉन संसर्गामुळे देशातील पहिल्या मृत्यूची पुष्टी केली. "दु:खाने, होय, ओमिक्रॉन हॉस्पिटलायझेशन तयार करत आहे आणि दुःखाची गोष्ट म्हणजे, ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे,"असं विधान जॉन्सन यांनी केलं आहे.  बीबीसीने वृत्त दिले आहे की, ओमिक्रॉन स्ट्रेनचा प्रसार “आश्चर्यकारक दराने” होत आहे आणि लंडनमध्ये सुमारे 40 टक्के संसर्ग होतो.

दिल्ली सरकार नवीन वर्षाच्या आठवड्यात निर्बंध घालू शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की, आम्ही ओमायक्रॉन प्रकाराला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. इतकंच नाही तर गरज भासल्यास दिल्लीतील ओमायक्रॉनशी लढण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लादले जाऊ शकतात, असंही ते म्हणाले.''गरज पडल्यास आम्ही निर्बंध लादू. सध्या तरी निर्बंधांची गरज नाही. आम्ही तज्ञांच्या सतत संपर्कात आहोत आणि दिल्लीतील लोकांच्या सुरक्षेसाठी जर काही निर्बंध घालायचे असतील तर आम्ही ते करू''. केजरीवाल ‘दिल्ली की योगशाळा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांच्या समुहाशी बोलत होते. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी