Omicron Maharashtra Update four patients from Pimpari, one patient from Pune and one patient from Dombivli recoverd from omicron मुंबईः आनंदाची बातमी. महाराष्ट्रातील ओमायक्रॉनचे दहापैकी सहा रुग्ण बरे झाले. राज्यात आता मुंबईचे दोन आणि पिंपरी-चिंचवडचे दोन असे चार ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.
बापरे ! यूएईहून उस्मानाबादमध्ये आलेला एक व्यक्ती आढळला पॉझिटिव्ह
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत आढळलेला ओमायक्रॉनबाधीत रुग्ण काल (गुरुवार ९ डिसेंबर २०२१) बरा झाला. यानंतर आज (शुक्रवार १० डिसेंबर २०२१) पुण्यातील एक आणि पिंपरी-चिंचवडचे चार ओमायक्रॉनबाधीत रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रातले ओमायक्रॉनची बाधा झालेले दहापैकी सहा जण बरे झाले.
फिनलंडहून पुण्यात आलेला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळल्यामुळे उपचार घेत असलेला रुग्ण दहा दिवसांत बरा झाला. त्याला २९ नोव्हेंबर २०२१ रोजी ताप आला. ताप आल्यावर केलेल्या चाचणीत तो ओमायक्रॉनबाधीत असल्याचे लक्षात आले. वेळेत उपचार झाले आणि दहा दिवसांत तो बरा झाला. ओमायक्रॉनची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला दहा दिवसांनी आज डिस्चार्ज देण्यात आला.
पिंपरी-चिंचवडमध्ये ४४ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षांच्या मुली तसेच १२ आणि १८ वर्षांच्या मुली अशा सहा जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली होती. यापैकी ४४ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, सात आणि दीड वर्षांच्या मुली यांच्या ओमायक्रॉन टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत तर १२ आणि १८ वर्षांच्या मुलींचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
आतापर्यंतच्या संशोधनानुसार, कोरोना विषाणूचा नवा अवतार असलेल्या 'ओमायक्रॉन'ची बाधा ज्यांना झाली त्यांच्यात आढळलेली कोरोनाची लक्षणे सौम्य स्वरुपाची आहेत. महाराष्ट्रात आढळलेल्या दहा ओमायक्रॉनबाधितांपैकी सहा जणांच्या टेस्ट दोन आठवड्यांच्या आत निगेटिव्ह आल्या आहेत. वेळेत उपचार मिळाल्यामुळे हे रुग्ण बरे झाले आहेत.
ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत असला तरी तो धोकादायक नाही, असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हा अगदी प्रारंभीचा निष्कर्ष आहे. तज्ज्ञ या विषाणूबाबत आणखी संशोधन करत आहेत. महिन्याभरात आणखी नेमकेपणाने याबाबतची माहिती हाती येईल. ओमायक्रॉन बाबत आणखी माहिती हाती येईपर्यंत लसीकरणाचा वेग वाढवणे, मास्क घालणे, हात धुणे, स्वच्छता राखणे, सोशल डिस्टंस राखणे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे हेच नागरिकांना शक्य आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.