Mumbai Police News : मंत्रालयापासून काही अंतरावर घडली घटना, दोन पोलिसांचं निधन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Jul 28, 2022 | 16:33 IST

Mumbai Police News : मुंबईत दोन पोलिसांचे सेवा बजावताना निधन झाले. या दोन्ही घटना दक्षिण मुंबईत घडल्या. मंत्रालयापासून कारने अवघ्या काही मिनिटांत पोहोचता येईल अशा दोन ठिकाणी या घटना घडल्या.

On duty two policemen died in Mumbai
दोन पोलिसांचं निधन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • मंत्रालयापासून काही अंतरावर घडली घटना
  • दोन पोलिसांचं निधन
  • मुंबईत दुर्दैवी घटना

Mumbai Police News : मुंबईत दोन पोलिसांचे सेवा बजावताना निधन झाले. या दोन्ही घटना दक्षिण मुंबईत घडल्या. मंत्रालयापासून कारने अवघ्या काही मिनिटांत पोहोचता येईल अशा दोन ठिकाणी या घटना घडल्या. एका पोलिसाचे राजभवनात आणि दुसऱ्या पोलिसाचे मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत निधन झाले. 

महिलांनो सावधान! Instagram वर DP, Photo आणि Reel मुळे होऊ शकते सेक्सटॉर्शन

Mumbai Crime: मुंबई हादरली ! १३ वर्षीय मुलावर ६ अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार

Cabinet Decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय

राजभवनात पोलीस अधिकाऱ्याचे निधन

राजभवनात कार्यरत असलेले राजभवन सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक विकास धोंडीराम भुजबळ यांचे निधन झाले. बुधवारी दुपारी राजभवन परिसरातील कार्यालयात असतानाच भुजबळ यांना छातीत दुखू लागले. सहकाऱ्यांनी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेले. पण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. 

भुजबळ यांनी मुंबई आणि राज्यात इतर अनेक ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शोक व्यक्त केला आहे.

पोलीस हवालदाराचे निधन

पोलीस हवालदार शरद पंढरीनाथ पवार (४९) हे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या मोबाईल २ वर सोमवारी रात्रपाळीला कर्तव्यावर होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास चर्चगेट पोलीस चौकी येथे ते सहकाऱ्यांसोबत जेवण करत होते. तिथेच त्यांना चक्कर आली. जीटी हॉस्पिटल येथे त्यांना नेण्यात आले. तिथेच त्यांचे निधन झाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी