avighna park fire मुंबईच्या अविघ्न पार्कला आग, एकाचा मृत्यू, दोषी कोण यावरुन वाद

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 22, 2021 | 18:09 IST

one dead in avighna park fire, blame game begins मुंबईच्या करी रोड परिसरातील अविघ्न पार्क या ६४ मजली इमारतीला आग लागली. या आगीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू

one dead in avighna park fire, blame game begins
मुंबईच्या अविघ्न पार्कला आग, एकाचा मृत्यू, दोषी कोण यावरुन वाद 
थोडं पण कामाचं
  • मुंबईच्या अविघ्न पार्कला आग, एकाचा मृत्यू, दोषी कोण यावरुन वाद
  • आगीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू
  • आग प्रकरणात चौकशी सुरू

मुंबईः मुंबईच्या करी रोड परिसरातील अविघ्न पार्क (One Avighna Park) या ६४ मजली इमारतीला आज (शुक्रवार २२ ऑक्टोबर २०२१) आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे इमारतीच्या १९व्या मजल्यावर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. one dead in avighna park fire, blame game begins

इमारतीला आग लागल्यावर एका व्यक्तीने १९व्या मजल्यावरुन उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत या व्यक्तीला केईएममध्ये नेण्यात आले. तिथे तपासणी करुन डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

श्रीमंतांची वस्ती अशी अविघ्न पार्क या इमारतीची ओळख आहे. या इमारतीला आग लागली कारण इमारतीमधील आग विझवणारी यंत्रणा, वॉटर सिस्टिम कार्यरत नव्हती, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. तर इमारतीचे बिल्डर कैलाश अग्रवाल यांनी आग विझवण्यासाठी अविघ्न पार्कमध्ये पुरेशी आधुनिक उपकरणे असल्याचे सांगितले. ही उपकरणे नॉर्वेहून आणली आहेत आणि अलिकडेच इमारतीत फायर ड्रील झाले आहे, असेही कैलाश अग्रवाल म्हणाले. इमारतीचे हक्क अद्याप बिल्डरकडे आहेत, असे रहिवाशांनी सांगितले.

आग प्रकरणात चौकशी सुरू आहे. तपासाअंती कोणाला दोषी ठरवले जाणार आणि काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी