Booster Dose : बूस्टर डोस घेण्यात मुंबईकर उदासीन, अवघ्या 15 टक्के मुंबईकरांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

Booster Dose : कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यास मुंबईसह महाराष्ट्राचे नागरिक उदासीन दिसत आहे. मुंबईत अवघ्या 15 टक्के नागरिकांनी कोरोनाचा प्रतिबंधक डोस घेतला असून महाराष्ट्रातील 18 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिक आपल्या आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवत असल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

corona booster dose
कोरोना बूस्टर डोस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यास मुंबईसह महाराष्ट्राचे नागरिक उदासीन दिसत आहे.
  • मुंबईत अवघ्या 15 टक्के नागरिकांनी कोरोनाचा प्रतिबंधक डोस घेतला
  • महाराष्ट्रातील 18 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

Booster Dose : मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेण्यास मुंबईसह महाराष्ट्राचे नागरिक उदासीन दिसत आहे. मुंबईत अवघ्या 15 टक्के नागरिकांनी कोरोनाचा प्रतिबंधक डोस घेतला असून महाराष्ट्रातील 18 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिक आपल्या आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवत असल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. सरकारने 15 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान बूस्टर डोसचा अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात मुंबईतील एकूण 14 लाख 30 हजार नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. मुंबईतील 92.30 लाख नागरिक हे प्रौढ नागरिक असून त्यांनी हा डोस घेणे अपेक्षित होते, परंतु मुंबईतील केवळ 15 टक्के नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. (only 15 percent mumbaikar get corona booster dose Maharashtra state also have less number in vaccination)

अधिक वाचा :  Milind Narvekar: 'आता मिलिंद नार्वेकर...', दसऱ्याच्या आधी बसणार 'मातोश्री'ला मोठा हादरा?


फक्त राजधानीच नव्हे तर राज्यातील नागरिकही बूस्टर डोस घेण्यास उदासीन दिसत आहेत. राज्यातील प्रौढ नागरिकांची संख्या 5 कोटींच्या घरात आहे. परंतु राज्यातील केवळ 65 लाख नागरिकांनी या काळात बूस्टर डोस घेतला आहे. आतापर्यंत राज्यातील 81 लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेतला असून केवळ 18 टक्के नागरिकांनी ही लस टोचून घेतली आहे. केंद्र सरकारने मोफत बूस्टर डोससाठी अमृत महोत्सवाचे आयोजन केले होते, त्यानंतर संपूर्ण देशभरात मोफत बूस्टर डोसचे अभियान राबवण्यात आले होते. परंतु दोन डोस घेतल्यानंतर नागरिकांनी तिसरा डोस घेण्यास उदासीनता दाखवला आहे. 

अधिक वाचा :  Mumbai Railway : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांच्या संख्येत वाढ, 1375 ऐवजी 1383 फेऱ्या होणार


ज्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत  आणि त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत ते बूस्टर डोस साठी पात्र आहेत. वृद्ध नागरिक आणि ज्यांना गंभीर आजार आहे त्यांनीच बूस्टर डोस घ्यावा असा सल्ला जगातील काही तज्ञांनी दिला आहे. असे असेल तरी राज्यातील केवळ 30 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी हा बूस्टर डोस घेतल्याची नोंद आहे. राज्यात बूस्टर डोस वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. अमृत महोत्सवापूर्वी कोरोना प्रतिबंधक लस केवळ खासगी केंद्रावर उपलब्ध होती, तसेच या लसी मोठ्या शहरांत उपलब्ध असल्याने प्रतिबंधक लस घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगितेल जात आहे. 

अधिक वाचा :  Neelam Gorhe : भाजपने किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांना रोजगार मिळवून दिला - नीलम गोऱ्हे  


कोरोना साथरोग अद्याप संपलेला नाही, काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत आणि कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्य किंवा केंद्र सकारनेही कोरोना संकट संपल्याचे जाहीर केले नाही. कोरोना प्रतिबंधल लसीमुळे कोरोनाची लागण होत नाही असे नाही, परंतु ही लस घेतल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होतो, यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे असे पालिकेने म्हटले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी