Maharashtra Police Bharti: अरं गड्या नशीब बदलवण्यासाठी लागलीत फक्त 90 मिनिटं, जाणून घ्या पोलीस भरती परीक्षेचा पॅटर्न

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 13, 2022 | 15:43 IST

महाराष्ट्र कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावेत. महाराष्ट्र पोलिस ड्रायव्हर पदांसाठी, ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.  पात्र उमेदवार किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचे असावेत. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Maharashtra Police : It only took 90 minutes to change the fortunes
अरं गड्या नशीब बदलवण्यासाठी लागलीत फक्त 90 मिनिटं  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटे असणार आहे.
  • महाराष्ट्र कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावेत.
  • सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे.

मुंबई :  राज्यात नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरतीची (Maharashtra Police Recruitment) घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारने तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे.  पोलीस दलात नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी अधिकृत वेबसाइट policerecruitment2022.mahait.org किंवा mahapolice.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल, SRPF पोलिस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर पोलिस कॉन्स्टेबल पदांसाठी सुमारे 18334 रिक्त जागा भरल्या जातील.  (only takes 90 minutes to change your fortune, know Police Recruitment Exam Pattern)

अधिक वाचा  : घरात बैठक सुरू असताना सासरच्या मंडळींनी विवाहितेला पाजले विष

पण उमेदवारांनो, तुमचं भाग्य बदलण्यासाठी फक्त 90 मिनिटे मिळणार आहोत. पोलीस भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या पोलीस परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटे असणार आहे. दरम्यान शासनाकडून पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर केली असून 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? यासाठी परीक्षा कशी होणार त्याचं पॅटर्न कसं असणार याबद्दलचे प्रश्न अनेकांना पडले असतील. आज आपण या परीक्षेची पॅटर्न सांगणार आहोत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

महाराष्ट्र कॉन्स्टेबल भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावेत. महाराष्ट्र पोलिस ड्रायव्हर पदांसाठी, ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.  पात्र उमेदवार किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 28 वर्षांचे असावेत. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

अधिक वाचा  : चाणक्याच्या या नीतिचा जीवनात करा अवलंब मिळेल श्रीमंती

अर्ज कसा करायचा?

सर्व प्रथम महाराष्ट्र पोलीस policerecruitment2022.mahait.org किंवा mahapolice.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा. आवश्यक तपशील प्रविष्ट करून येथे नोंदणी करा. नोंदणीकृत लॉगिन क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करा आणि अर्ज भरा. संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी जमा करा. महाराष्ट्र पोलीस भरती 2022प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. 

अशी असेल शारीरिक चाचणी

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50 गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

अशी असेल लेखी परीक्षा

100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी