मुंबई : अनिल परब हे आमचे सहकारी आहेत कॅबिनेट मंत्री आहेत पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत अशा प्रकारच्या कार्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. या प्रकारच्या आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर लावले जात आहे दिल्लीकडून त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर आहेत परंतु त्यांच्यावर कोणी हात लावत नाही, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी केला आहे.
आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सूडाच्या आणि बदलाच्या भावनेने किती कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. सर्व निवडणुका सुरळीत पार पाडू सरकार सुरळीत चालेल आणि अशा कार्यामुळे भारतीय जनता पक्ष हा रोज खड्ड्यात जात आहे, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतका वाईट वळण गेल्या पंचावन्न वर्षात कधी मिळालं नव्हतं. तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे त्यामुळे राज्यातील राजकीय विरोधकांना अशाप्रकारे नामोहरण करावा असं कुणाला वाटत असेल तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास सरकारचा मनोबल अशा प्रत्येक कारवायांमुळे आमचे मनोबल वाढत जाईल, असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.
आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना विरोधात असंख्य पुरावे आहेत जितू नवलानीला कोणी पळवलं याचे उत्तर सुद्धा सबळ पुरावे असणाऱ्यांनी द्यावे, अनिल परब विरोधात तक्रार करण्यात आली, तेव्हा महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने माहिती दिली होती याबाबत माझ्याकडे तांत्रिक बाबींविषयी माहिती नाही, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील आणि पश्चिम बंगाल मधीलच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू आहेत आत्ता फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहे
- राजकीय सूडाच्या बुद्धीने कारवाया म्हटलं की त्यात सर्व काही आलं
- फक्त शिवसेनेला त्रास द्यायचं शिवसेनेला बदनाम करायचं महाविकास आघाडीला कोंडीत आणण्यासाठी या संपूर्णपणे कारवाया सुरू आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या कारवाया केल्या जात आहेत परंतु आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही.
मी सातत्याने घोटाळ्याचे पेपर दिल्लीला देत आहेत परंतु त्यावर साधं उत्तर येत नाही आहे विक्रांत घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो.
टॉयलेट घोटाळा अजून मोठा प्रकाराने समोरील माझ्यावर मानेचा गुन्हा दाखल केला म्हणून मी त्या मागे येणार नाही मी मी इतर काही प्रकरण पाठवले आहेत ये इकडे परंतु ती फाइल उघडून पाहण्याची तसदी देखील कोणी घेत नाही परंतु आम्ही देखील पाहून घेऊ असे राऊत म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.