मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत यांच्या विवाहानिमित्त नुकताच संगीत सोहळा (Music ceremony) आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांच्यासोबत केलेला डान्स (Dance) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. मात्र या डान्सवरुन विरोधक नाराज झाले आहेत.
भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील (BJP leader Radhakrishna Vikhe-Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi government) जोरदार टीका (Criticized) केली आहे.विखे-पाटील म्हणाले, “एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि तुम्ही काय करता तर लग्नात नाचता. लग्नात तुम्ही नृत्य करता. एकीकडे लोक आत्महत्या करत आहेत. दुसरीकडे वीज कनेक्शन तोडले जात आहेत. गावची गावे अंधारात आहेत. जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, हीच महाविकास आघाडीची कर्तबगारी आहे का?”
दरम्यान, संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत ही आज 29 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. लग्नाआधी आयोजित संगीत कार्यक्रमात सर्वच उपस्थितांनी ठेका धरला. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंबही उपस्थित होते.
संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संगीत कार्यक्रमात संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लँबोर्गिनी चलााई जाने ओ या गाण्यावर ठेका धरला. सुळे यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नृत्यात सहभागी व्हायला लावल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.