Ajit Pawar : सरकार गेल्यानंतर अजित पवारांनी वाढदिवसासंदर्भात घेतला मोठा निर्णय..

Ajit Pawar birthday: अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (22 जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Opposition leader Ajit Pawar's decision not to celebrate his birthday
वाढदिवसासंदर्भात अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय...  
थोडं पण कामाचं
  • राज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर यांचा निर्णय
  • वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय
  • सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन

Ajit Pawar birthday celebration ,मुंबई : अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (22 जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. (Opposition leader Ajit Pawar's decision not to celebrate his birthday)

अधिक वाचा :  आरोग्य संदर्भातील सर्व बातम्या एकाच ठिकाणी 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा उद्या (22 जुलै रोजी) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टीव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

अधिक वाचा :  खेळ  । आरोग्य । जीवनशैली

यापूर्वीही अनेक नेत्यांनी आपत्तीच्या वेळी असाच निर्णय घेत वाढदिवस साजरा केला नव्हता. कोव्हीडच्या काळात माजी मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाढदिवस न साजरा करण्याचे आव्हान शिवसैनिकांना केले होेते. कोकण (kokan), पश्चिम महाराष्ट्रावर (paschim maharashtra) निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र (maharashtra) शोकाकुल असून, कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी गेल्या 25 जुलै 2021 रोजी केले होते. उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस हा 27 जुलै रोजी असतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी