बंदला विरोध म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन – जयंत पाटील

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 11, 2021 | 12:19 IST

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

Jayant Patil
जयंत पाटील  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.
  • बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा दिला.
  • बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.  लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडी चिरडल्याची घटना घडली होती.  लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते.

याच्याच निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने आज बंद पुकारला आहे. सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. या बंदला आधी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र, नंतर नरमाईची भूमिका घेत बंदला पाठिंबा असल्याचे व्यापाऱ्यांनी जाहीर केले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाष्य केले आहे. बंद मोडून काढण्याची भाषणा करणारे मूर्ख आहेत असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. 

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आणि आमचे मित्र पक्ष यांच्यावतीने हा बंद आम्ही पुकारला आहे. या बंदचं कारण म्हणजे भाजप आजपर्यंत देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत होती. दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. भाजपला त्यांचं राजकीय मत आग्रहाने मांडायचं आहे हे समजू शकतो, पण लखीमपूरसारखी घटना जाणीवपूर्वक केलेलं हत्याकांड आहे,” असे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्र बंदला विरोध करणे म्हणजे भाजपाकडून शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं अप्रत्यक्ष समर्थन करणं असेही पाटील म्हणाले. 

लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केला असून बंद १०० टक्के यशस्वी आहे. किरकोळ घटना घडल्या असतील तर बंद असताना जगभरात घडतात,” असं राऊत म्हणाले आहेत. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. आज संपूर्ण देश महाराष्ट्राकडे पाहत आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी