Mumbai Dust Wave : पाकिस्तानातील धुळीचे वादळ धडकले महाराष्ट्रात; मुंबई, पुण्यात गाड्यांवर पसरली धुळीची चादर

रविवारी मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गार वारे वाहत होते. भारतीय हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवळाकी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुकं पसरले आहे. गेल्या काही महिन्यांत थंडीची लाट आणि अवकाळी पावसाने कहर केला आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. पाकिस्तानातून धुळीचे वादळ गुजरातहून महाराष्ट्रात धडकले आहे.

mumbai dust storm
धुळीचे वादळ  
थोडं पण कामाचं
  • रविवारी मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गार वारे वाहत होते.
  • उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुकं पसरले आहे.
  • पाकिस्तानातून धुळीचे वादळ गुजरातहून महाराष्ट्रात धडकले आहे.

Mumbai Dust Wave : मुंबई : रविवारी मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत गार वारे वाहत होते. भारतीय हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवळाकी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात धुकं पसरले आहे. गेल्या काही महिन्यांत थंडीची लाट आणि अवकाळी पावसाने कहर केला आहे. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. पाकिस्तानातून धुळीचे वादळ गुजरातहून महाराष्ट्रात धडकले आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात हवेचे धुलीकण साठले आहेत. मुंबईत अनेक गाड्यांवर धुळीची चादर पसरली आहे. 


आज दुपारच्या सुमारास मुंबईतील अनेक गाड्यांवर अशा प्रकारच्या धुळीची चादर पसरली होती. महाराष्ट्रात आलेले हे वादळ पाकिस्तानहून आल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु भारतीय हवामान विभागाने अधिकृतरित्य याबाबत माहिती दिलेली नाही. भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ अधिकारी के एस होसाळीकर यांनी राज्यात धूळीचे वादळ येईल असा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या १२ तासांत अरबी सागरातून उत्तर कोकण, मुंबई, ठाणे आणि पालघर भागात जोरदार वारा आणि वादळ येईल असेही होसाळकर यांनी सांगितले. 


मुंबई सफेद धुळीची चादर

सध्या मुंबई गाडी चालवताना चालकांना धुसर दिसत आहे. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत आहे. आकाशात मळभ साचले असून धुळीचे वादळ उठले आहे, त्यामुळे सर्वठिकाणी अंधूक दिसत आहे. 


अवकाळी पाऊस आणि थंडीची लाट

मुंबईच्या दादर, लोअर परळ, महालक्ष्मी आणि आजूबाजूच्या परिसरात रविवावारी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि थंडीची लाट सुरू झाली. मुंबई, ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक आणि जळगाच्या काही भागात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर मुंबईत पुन्हा थंडी वाढली असून मुंबईकर गारठले आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबईत चांगलीच थंडी वाडह्ली असून पुढील काही दिवसांत पारा आणखी खाली जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

कोकणात अवकाळी पाऊस

तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू बागायतादारांना चांगलाच फटका बसला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी