Pankaja Munde Support Devendra Fadanvis : पंकजा मुंडेंनी केली फडणवीसांना दिला पाठिंबा, हा आहे मुद्दा.. 

Pankaja Munde Support Devendra Fadanvis । मुंबई: ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pankaja Munde Support Devendra Fadanvis for Nawab malik allegation
पंकजा मुंडेंनी केली फडणवीसांना दिला पाठिंबा, हा आहे मुद्दा.. 
थोडं पण कामाचं
  • ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
  • भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. 
  • देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत

Pankaja Munde Support Devendra Fadanvis । मुंबई: ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिक यांनी आज थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पण  पक्षांतर्गत धुसफुसीने चर्चेत असलेल्या  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. 

ड्रग्स पेडलर जयदीप राणा याचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांनी आज सकाळी अमृता फडणवीस आणि त्यानंतर देवेंद्र यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आणि पत्रकार परिषदेत फडणवीसांचे ड्रग पेडलरसोबत संबंध असल्याचा आरोप केला. या आरोपांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलर जयदीप राणा यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत आणि फडणवीसांच्या इशाऱ्यावरुनच राज्यात ड्रग्सचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांवर करण्यात आलाय. मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटले. 'ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढं चांगलं काम केलं, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे', असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

'दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार : फडणवीस'

नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवाब मलिक सध्या कोणत्या मानसिकतेमध्ये आहेत, हे सर्वांना माहिती आहे. नवाब मलिक यांनी लंवगी फटाकडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याबाबत आणि ड्रग्सबाबतही बोलू नये. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेले कनेक्शन उघड करणार असून, याचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनाही देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी