Pankaja Munde : ही निवडणूक जुगाडाची आहे यात नेते निर्णय घेतात - पंकजा मुंडे

मुंबई
Updated Apr 10, 2023 | 15:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

बीड जिल्ह्यातील कृधिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका काही दिवसावर येऊन आल्या आहेत या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रचारसभेला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.

Pankaja Munde's election dialogue meeting
ही निवडणूक जुगाडाची आहे यात नेते निर्णय घेतात - पंकजा मुंडे 
थोडं पण कामाचं
  • कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारासाठी परळीत जय्यत तैय्यारी!
  • पंकजा मुंडे यांची परळीत मतदान संवाद बैठक!
  • सर्व बाजार समीतीवर आपला विजय निश्चित-पंकजा मुंडे 

सुकेशनी नाईकवाडे (बीड) : बीड जिल्ह्यातील कृधिउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका काही दिवसावर येऊन आल्या आहेत, या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रचारसभेला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. (Pankaja Munde's election dialogue meeting!) 

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक आपल्या ताब्यात येण्यासाठी परळी येथील हालगे इंजेनीयरिंग कॉलेज येथे मतदान संवाद बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मतदात्याशी संवाद साधताना पंकजा मुंडे बोलत होत्या.  

कृषी उत्पन्न बाजार समितीही पक्षाच्या जोरावर निवडली जात नाही. निवडननुका ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात निवडणुकीमध्ये आपल्याला विजय अन पराभव हा जीवनात अनुभव येतच असतो  पृथ्वीवर असा एकही माणूस नाही तो कधी पडला नाही तास राजकारणात असा कोणताही माणूस नाही ,देशातल्या आज पर्यंत झालेल्या प्रधानमंत्री पासून ते ग्रामपंचायात निवडणुका लढत असताना पराभवास सामोरे जावे लागते.

पण पराभवाने खचून न जाता आपली हिम्मत बांधून आपली लोक परत बांधून ठेवण ही फार मोठी किमया राजकारणात करावी लागते. आज ही बैठक घेण्या मागचा उद्देश काहीच नाही.तुमचे चेहरे बघितल्यावर मला बर वाटत. आज तुम्हाला पाहून मला खूप छान वाटले.  निकाल जो काही होईल पण उत्साह महत्त्वाचा आहे असे कार्यकर्त्यांना उत्साह वाढतांना पंकजा मुंडे दोन शब्द बोलल्या. 

त्या पुढे म्हणाल्या की, आज मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही ते केलं तर मी लक्षात ठेवले.  ताईने सांगितलेल्या प्रत्येक प्रकारचे लोक आलेत आज बैठकीत आलेत हावसे नवसे गवसे असे सर्वच आले की बर वाटत आपल्याशी गप्प मारण्यासाठी मी आज आपल्यासोबत आले आहे. मी तुम्हाला काहीच ताण देणार नाही.  तुम्हाला याचा काहीच नाही परळीत ताण तर आम्हां बहीण भावाला असतो. 

पण आता काही गोष्टीत बदल होणार आहे असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या सोसायटी निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका यासाठी तुम्हला ताकतीने मदत करायची आहे मग ती मदत अनेक प्रकारची आहे असे ही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

 आज अनेकांना वाटत आहे की, निवडणूक होईना  मात्र आता या निवडणुकीत लोकांचा चांगला उच्छाह पाहवयास मिळत आहे.

या निवडणुका या जुगाडावर चालत असतात, अन आम्ही नेतेच याचे जुगाड करतो. आपल्या हातात तर मार्केट कमिटी नाही पण ही निवडणूक आपल्याला स्वाभिमानाने लढायची आहे. आपली भाकरी खाऊन लढायचे आहे दुसऱ्याची पुराण पोळी खाऊन लढायचं नाही आपलं इमान गहाण ठेऊन ही निवडणूक लढायची नाही असे ही पंकजा मुंडे यांनी बोलताना म्हटले आहे.

त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, पाच रुपये तुम्हला काही जन्मभर पूरत नाहीत,  महिला काहीच गडबड करत नाहीत मात्र पुरुष गडबड करतात म्हणून आपल्या ताईला सोडायचे नाही असे आपले वचन आहे.

नाराजी तुमची  आमच्यावर असेल पण ही वेळ वेळ नाराजी दाखवण्याची नाही, तर आपली खुटी बळकट करण्याची आहे.  माझी आई ऍडमिट आहे ब्रिज कॅण्डी हॉस्पिटलमध्ये पण मी नसण्याने तुम्हाला बरं वाटणार नाही म्हणून तुम्हाला आधार देण्यासाठी मी आले आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

तुम्हाला काय होतंय तुम्हाला कसली तरी लस टोचली आहे, कोविडची तुम्हाला  सत्तेपासून दूर राहण्याची विकासापासून दूर राहण्याची बीड जिल्ह्यातील विकास खुंटला आहे. तो परत पूर्ण करण्यासाठी आपल्याला विश्वासाने लढायचे आहे असे म्हणाल्या. 

मला आपल्यावर गर्व आहे काही लोक म्हणतात तुम्हला परळीने पाडले  मात्र मी तसे मनात नाही तुम्ही माझे कुटुंब आहे म्हणून मला आपली गरज आहे  म्हणत पंकजा मुंडे यांनी मतदात्यांना आव्हान केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी