Param Bir Singh : परमबीर सिंहांनी 26/11 हल्ल्यातील दहशतवादी कसाबचा मोबाईल लपवला, निवृत्त एसीपीचा गंभीर आरोप

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 25, 2021 | 11:48 IST

 Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंह  यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबईचे निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Parambir Singh hides terrorist Kasab's mobile in 26/11 attack
26/11 हल्ल्यातील दहशतवाद्यांना परमबीर सिंहांची मदत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • 26/11 मधील दहशतवाद्यांना परमबीर सिंह यानी मदत केल्याचा आरोप
  • 26/11च्या हल्यावेळी परमबीर सिंह हे एटीएसमध्ये कार्यरत होते.
  • दहशतवादी कसाब याचा माबाईल आजपर्यंत पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

 Param Bir Singh: मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंह  यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुंबईचे निवृत्त एसीपी शमशेर पठाण यांनी आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांच्यावर मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी कसाब याचा (Terrorist Kasab) मोबाईल (Terrorist Kasab's Mobile) गायब केल्याचा आरोप आहे. निवृत्त ACP शमशेर पठाण यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. याप्रकरणी शमशेर पठाण यांनी परमबीर सिंह यांची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.

शमशेर पठाण यांनी यासंदर्भात त्यांनी यावर्षी 26 जुलैला मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. त्यात परमबीर सिंह यांनी दहशतवादी कसाबचा मोबाईल गायब करण्याचा आरोप केला आहे. याबाबत पठाण यांनी जुलै महिन्यात राज्याचे गृहमंत्री आणि  मुंबई पोलीस आयुक्त यांना हे पत्र लिहिले होते. 26/11 मधील  दहशतवाद्यांना परमबीर सिंह यानी मदत केल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे.

पठाण यांने आपल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाब याचा मोबाईल त्यावेळी स्वत:कडे ठेवून घेतला होता. या 26/11च्या हल्यावेळी परमबीर सिंह हे एटीएसमध्ये कार्यरत होते. आजपर्यंत कसाबचा मोबाईल तपास यंत्रणेच्या हाती लागला नसल्याचे आरोप पठाण यांनी केला आहे.या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला होता, त्यानंतरही त्यांनी तो मोबाईल क्राइम ब्रँचकडे सोपवला गेला नाही. या प्रकरणाचीही चौकशी करण्याची विनंती पठाण यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी