Param Bir Singh CBI Enquiry: वाचणार की अडकणार? सीबीआयकडून परमबीर सिंगची चौकशी, 'त्या' पाच प्रकरणांचा होणार तपास

मुंबई
भरत जाधव
Updated Apr 14, 2022 | 08:42 IST

माजी गृहमंत्री (Former Home Minister ) अनिल देशमूख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ माजवणारे परमबीर सिंग, आता अडचणीत सापडणार आहेत. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh) यांची आता सीबीआयकडून (CBI) चौकशी होणार आहे.

Parambir Singh's probe by CBI
सीबीआयकडून परमबीर सिंगची चौकशी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणी गोळा केल्याचा आरोप केला होता.
  • परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तपास सीबीआयकडे सोपविण्याची विनंती न्यायालयाला केली

मुंबई: माजी गृहमंत्री (Former Home Minister ) अनिल देशमूख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ माजवणारे परमबीर सिंग, आता अडचणीत सापडणार आहेत. कारण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) परमबीर सिंग (Parambir Singh) यांची आता सीबीआयकडून (CBI) चौकशी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी गेल्या महिन्यात आदेश दिले होते. परमबीर सिंग यांच्याविरोधातील खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास सीबीआयने अधिकृतपणे आपल्या ताब्यात घेतला आहे.

सीबीआय ज्या प्रकरणांचा तपास करणार आहे, त्यात राज्य पोलिसांच्या एकूण पाच ‘एफआयआर’चा समावेश आहे.  दरम्यान, सीबीआयचे दिल्लीतील विशेष पथक मुंबईत दाखल होत आहे. हे पथक मुंबई सीबीआय कार्यालयाच्या सहकार्याने नव्याने तपास करील, असे सूत्रांनी सांगितले. परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणी गोळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर परमबीर यांनीही मोठ्या प्रमाणात खंडणी उकळल्याचा आरोप झाला होता.

याप्रकरणी ठाणे व मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले होते. या पाच प्रकरणांपैकी एक प्रकरण पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या छळाचेही आहे. अन्य एका प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त असताना नऊ लाख रुपये व दोन लाख ९२ हजार रुपये किमतीचे मोबाइल हँडसेट खंडणीच्या रूपात बारमालकांकडून उकळल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांत तीन विकासकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सर्व आरोपांचा महाराष्ट्र पोलिसांनी तपास सुरू केला होता. हा तपास थांबविण्याबाबत परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे परमबीर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन तपास सीबीआयकडे सोपविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. 
त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपविण्याचे; तसेच ठाणे व मुंबई पोलिसांचे सर्व ‘एफआयआर’देखील सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचे आदेश २४ मार्च रोजी दिले होते. त्यानंतर आता सीबीआयने स्वत:चा स्वतंत्र ‘एफआयआर’ या प्रकरणात दाखल केला आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी