VIDEO लोकलखाली जात असलेल्या महिलेला RPFच्या महिला जवानाने वाचवले

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 22, 2021 | 23:26 IST

Passenger Fell From Train RPF Employee Save Life Watch Shocking Viral Video भायखळा रेल्वे स्टेशनवर एक थरारक घटना घडली. लोकलमध्ये चढत असताना पाय निसटल्यामुळे एक महिला ट्रेनखाली जात होती. आरपीएफच्या सपना गोलकर यांनी ही घटना बघितली आणि वेगाने पुढे जाऊन महिलेला वाचवले. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली.

Passenger Fell From Train RPF Employee Save Life Watch Shocking Viral Video
VIDEO लोकलखाली जात असलेल्या महिलेला RPFच्या महिला जवानाने वाचवले 
थोडं पण कामाचं
  • VIDEO लोकलखाली जात असलेल्या महिलेला RPFच्या महिला जवानाने वाचवले
  • थरारक घटना भायखळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक येथे घडली
  • आरपीएफच्या सपना गोलकर यांनी ४० वर्षीय महिलेला वाचवले

Passenger Fell From Train RPF Employee Save Life Watch Shocking Viral Video मुंबईः भायखळा रेल्वे स्टेशनवर एक थरारक घटना घडली. लोकलमध्ये चढत असताना पाय निसटल्यामुळे एक महिला ट्रेनखाली जात होती. आरपीएफच्या सपना गोलकर यांनी ही घटना बघितली आणि वेगाने पुढे जाऊन महिलेला वाचवले. ही संपूर्ण घटना स्टेशनवरील कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली.

थरारक घटना भायखळा स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक येथे घडली. एक ४० वर्षांची महिला ट्रेनमध्ये चढत होती. नेमकी त्याच वेळी ट्रेन सुरू झाली. महिलेला ट्रेनमध्ये प्रवेश करणे जमले नाही. ट्रेन सुरू झाली त्यावेळी एक पाय आत आणि दुसरा बाहेर अशा स्थितीत असलेल्या या महिलेचा एकदम तोल गेला. महिलेला तोल सावरणे जमले नाही. यामुळे ती महिला वेग घेत असलेल्या ट्रेनच्या खाली जाण्याचा धोका निर्माण झाला. 

स्टेशनवर ऑन ड्युटी असलेल्या आरपीएफच्या सपना गोलकर यांना काय झाले आहे याचा अंदाज आला. सपना गोलकर यांनी क्षणार्धात महिलेच्या दिशेने धावत जाऊन तिला सावरले आणि वेग घेत असलेल्या ट्रेन पासून दूर सुरक्षित अंतरावर नेले. यामुळे महिला वाचली. महिलेचे प्राण वाचवणाऱ्या आरपीएफच्या सपना गोलकर यांचे स्टेशनवर उपस्थित असलेल्यांनी तसेच तसेच आरपीएफच्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी कौतुक केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी