प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेच्या मेगाब्लॉकविषयी महत्त्वाची सूचना

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Dec 03, 2022 | 07:45 IST

passengers please pay attention, important announcement about railway megablock : प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नसेल. पण कर्जत यार्ड सुधारणेसाठी शनिवार आणि रविवारी सुमारे दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

passengers please pay attention, important announcement about railway megablock
प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेच्या मेगाब्लॉकविषयी महत्त्वाची सूचना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • प्रवासी कृपया लक्ष द्या, रेल्वेच्या मेगाब्लॉकविषयी महत्त्वाची सूचना
  • रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी रेल्वेचा दिवसा होणार असलेला मेगाब्लॉक रद्द
  • कर्जत यार्ड सुधारणेसाठी शनिवार आणि रविवारी सुमारे दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार

passengers please pay attention, important announcement about railway megablock : प्रवासी कृपया लक्ष द्या, मंगळवार 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक 2-3 दिवसांत मुंबईत येण्याची शक्यता आहे. यामुळे उद्या म्हणजेच रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी रेल्वेचा दिवसा होणार असलेला मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. रविवार 4 डिसेंबर 2022 रोजी मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर दिवसा मेगाब्लॉक नसेल. पण कर्जत यार्ड सुधारणेसाठी शनिवार आणि रविवारी सुमारे दीड तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत नेरळ ते खोपोली दरम्यान लोकल धावणार नाही.

Shreyas Talpade : 'पुष्पा'ला आवाज दिल्यापासून श्रेयस तळपदे फायद्यात, डबिंगच्या मिळू लागल्या मोठ्या ऑफर

Movies to Release in December : डिसेंबरमध्ये ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होणार 'हे' बिग बॅनर सिनेमा

कर्जत यार्ड सुधारणा, शनिवार 3 डिसेंबर 2022

  1. स्टेशन : भिवपुरी रोड ते पळसदरी
  2. मेगाब्लॉकची वेळ : सकाळी १०.४५ ते दुपारी १२.१५
  3. परिणाम - सकाळी ९.०१, ९.३० आणि ९.५७ ला सुटणारी सीएसएमटी-कर्जत कर्जत लोकल नेरळपर्यंत धावणार आहे. सकाळी १०.४५, ११.१९ आणि दुपारी १२ची कर्जत-सीएसएमटी लोकल नेरळ स्थानकातून चालवण्यात येईल. स. १०.४०, दु. १२ची कर्जत-खोपोली आणि स. ११.२०, दु. १२.४० खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.

कर्जत यार्ड सुधारणा, रविवार 4 डिसेंबर 2022

  1. स्टेशन : भिवपुरी रोड ते पळसदरी
  2. मेगाब्लॉकची वेळ : सकाळी ११.२० ते दुपारी १२.२०
  3. परिणाम :  सकाळी ९.३०, ९.५७ वाजता सुटणारी सीएसएमटी-कर्जत लोकल नेरळपर्यंत धावणार आहे. सकाळी ११.१९ आणि दुपारी १२ची कर्जत-सीएसएमटी लोकल नेरळ स्थानकातून चालवण्यात येईल. दुपारी १२ची कर्जत-खोपोली आणि सकाळी ११.२० खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी