आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याला दिली दिलासादायक बातमी

सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे.

patient doubling time for the maharashtra state now improved to 17.5 days
राज्याला आणखी एक दिलासा, रुग्ण दुपटीचा कालावधी १७.५ दिवसांवर   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी १७.५ दिवसांवर
  • आतापर्यंत २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडले
  • राज्यात कोरोनाच्या ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या  २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

दिलासादायक बातमी

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  1. मुंबई महानगरपालिका: बाधीत रुग्ण- (३८,४४२), बरे झालेले रुग्ण- (१६,३६४), मृत्यू- (१२२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,८४५) 

  2. ठाणे: बाधीत रुग्ण- (९१२३), बरे झालेले रुग्ण- (२९७३), मृत्यू- (१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९६८)

  3. पालघर: बाधीत रुग्ण- (९६८), बरे झालेले रुग्ण- (३२९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०९) 

  4. रायगड: बाधीत रुग्ण- (१०४२), बरे झालेले रुग्ण- (५४९), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५२) 

  5. नाशिक: बाधीत रुग्ण- (११११), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५८) 

  6. अहमदनगर: बाधीत रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५) 

  7. धुळे: बाधीत रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३) 

  8. जळगाव: बाधीत रुग्ण- (६०७), बरे झालेले रुग्ण- (२७२), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६३) 

  9. नंदूरबार: बाधीत रुग्ण- (३४), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११) 

  10. पुणे: बाधीत रुग्ण- (७५३७), बरे झालेले रुग्ण- (३५५९), मृत्यू- (३२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५८) 

  11. सोलापूर: बाधीत रुग्ण- (८७२), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५१) 

  12. सातारा:  बाधीत रुग्ण- (४९०), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२६) 

  13. कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (४२९), बरे झालेले रुग्ण- (१०४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३२१) 

  14. सांगली: बाधीत रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६) 

  15. सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६) 

  16. रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (९०), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४७) 

  17. औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (१४६२), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४११) 

  18. जालना: बाधीत रुग्ण- (११९), बरे झालेले रुग्ण- (४५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४) 

  19. हिंगोली: बाधीत रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२) 

  20. परभणी: बाधीत रुग्ण- (५७), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३) 

  21. लातूर: बाधीत रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (५५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६०) 

  22. उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (१८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८) 

  23. बीड: बाधीत रुग्ण- (४६), बरे झालेले रुग्ण- (५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (४१) 

  24. नांदेड: बाधीत रुग्ण- (१०८), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६) 

  25. अकोला: बाधीत रुग्ण- (५७१), बरे झालेले रुग्ण- (२८९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३) 

  26. अमरावती: बाधीत रुग्ण- (२१३), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६) 

  27. यवतमाळ: बाधीत रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८) 

  28. बुलढाणा: बाधीत रुग्ण- (५८), बरे झालेले रुग्ण- (२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६) 

  29. वाशिम: बाधीत रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२) 

  30. नागपूर: बाधीत रुग्ण- (५५६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९३) 

  31. वर्धा: बाधीत रुग्ण- (११), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०) 

  32. भंडारा: बाधीत रुग्ण- (२९), बरे झालेले रुग्ण- (१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८) 

  33. गोंदिया: बाधीत रुग्ण- (६१), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३३) 

  34. चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०) 

  35. गडचिरोली: बाधीत रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४) 

  36. इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४) 

एकूण: बाधीत रुग्ण-(६५,१६८), बरे झालेले रुग्ण- (२८,०८१), मृत्यू- (२१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टीव्ह रुग्ण-(३४,८८१) 

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ४७ हजार ७७२ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी