Patra Chaal case चौकशी; खासदार संजय राऊतांच्या घरी आली EDची टीम, पाठवलेल्या समन्सला राऊतांचा होता नो रिप्लाय

मुंबई
भरत जाधव
Updated Jul 31, 2022 | 09:03 IST

 शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतेमंडळीमागे केंद्र सरकारने (Central Govt) ईडीची पिडा जोरदारपणे लावल्याने शिवसेना संकटात सापडली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर ईडीची नजर आहे, दरम्यान सध्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे ईडीच्या गोत्यात अडकले आहेत. आज सकाळी खासदार राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्रा चाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Patra Chaal case: ED team came to MP Sanjay Raut's house
Patra Chaal case : खासदार संजय राऊतांच्या घरी आली EDची टीम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे.
  • पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता.

Sanjay Raut ED News :  शिवसेनेच्या (Shiv Sena) नेतेमंडळीमागे केंद्र सरकारने (Central Govt) ईडीची पिडा जोरदारपणे लावल्याने शिवसेना संकटात सापडली आहे. शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर ईडीची नजर आहे, दरम्यान सध्या खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे ईडीच्या गोत्यात अडकले आहेत. आज सकाळी खासदार राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे. पत्रा चाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

ईडीकडून पाठवलेल्या समन्सला संजय राऊतांनी उत्तर दिलं नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक थेट त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आठ अधिकाऱ्यांची टीम संजय राऊतांच्या घरी चौकशीसाठी पोहोचली आहे. आज दिवसभर ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. 

Read Also : मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक

ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संजय राऊत सहकार्य करत नसल्यानं त्यांची चौकशी करण्यासाठी हे पथक दाखल झाले आहे. याआधी राऊत यांना दोन वेळा समन्स दिले होते. आज त्यांची चौकशी करायची असे आदेश दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर हे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले आहे. संजय राऊत यांच्यासह त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार आहे. 

नेमकं काय पत्राचाळ प्रकरण... 

पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

Read Also : झिंबाब्वे विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. 

संजय राऊतांना ईडीनं का पाठवला समन्स? 

ईडीने 1 फेब्रुवारी रोजी ECIR दाखल केली होती. त्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित मालमत्तांवर एकूण 7 ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच, प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आले असून त्याचा तपास सुरू आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता.

Read Also : उच्च कोलेस्टेरॉलचा डोळ्यांवर काय परिणाम होतो? तीन लक्षणे

याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.  सुजित पाटकर आणि संजय राऊत यांची मुलगी एका वाईन ट्रेडिंग फर्ममध्ये भागीदार आहेत. पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने अलिबागमध्ये भागीदारीमध्ये जमीन खरेदी केल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळेच संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी