Patra Chaal scam case: संजय राऊतांची ईडी कोठडी आज संपणार की मुक्काम वाढणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी

मुंबई
भरत जाधव
Updated Aug 04, 2022 | 07:53 IST

पत्रा चाळ (Patra Chaal) घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेल्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (custody) सुनावली होती. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला.

Will Sanjay Raut get bail? Hearing in court again today
संजय राऊतांना जामीन मिळणार? आज पुन्हा कोर्टात सुनावणी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ईडीकडून राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी केली जाणार
  • पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला.
  • प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते.

Sanjay Raut : पत्रा चाळ (Patra Chaal) घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) अटकेत असलेल्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी (custody) सुनावली होती. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत राऊतांना फक्त ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली होती. आज न्यायालयात परत संजय राऊत यांच्या घोटाळ्याप्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आज संजय राऊत यांना जामीन मिळणार का ईडीच्या तुरुंगात त्यांचा मुक्काम वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कारण, खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता सक्तवसुली संचालनालयाने तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे राऊत यांची कोठडी आणखी वाढवून मिळण्याची मागणी केली जाणार आहे. राऊत यांच्या अटकेचे समर्थन करताना संचालनालयाचे सहायक संचालक डी. सी. नाहक यांनी रिमांड अर्जात म्हटले आहे की, पत्रा चाळ प्रकल्पात प्रवीण राऊत यांना मिळालेल्या ११२ कोटी तूर्तास एक कोटी सहा लाख रुपये संजय राऊत यांना मिळाले हे सकृद्दर्शनी दिसत असले तरी रोख रकमेच्या स्वरूपात राऊत यांना मोठी रक्कम मिळाली आहे.

Read Also : CWG 2022: ज्युदोमध्ये भारताची हॅटट्रिक तर तुलिकाचा विक्रम

पत्रा चाळ प्रकल्प हा सुरुवातीला मे. गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला म्हाडाने मंजूर केला होता. मात्र या कंपनीत संचालक असलेल्या प्रवीण राऊतने हा प्रकल्प म्हाडाकडून मंजूर होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी संजय राऊत यांनी मदत केली, असा मुख्य आरोप आहे.

प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत?

पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होते, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत असा दावा ईडीने केला आहे. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर बेल मिळाली तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात, तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे. 

ईडीने कोणते आरोप केले?

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट हात

प्रविण राऊत हे नुसता फ्रन्ट मॅन असून संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला.

Read Also : IND W vs BAR W T20:: भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक

संजय राऊत यांना 1 कोटी 6 लाख रुपये 

प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे  याच पैशातून जमिन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. 

खरे आरोपी संजय राऊत

या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करून सर्व व्यवहार करत होते असं ईडीने न्यायालयात सांगितलं. मग पत्राचाळ गैरव्यवहारातील पैसे असो की दादर येथील घर आणि अलिबाग येथील जमीन सर्व व्यवहार संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आले. 

साक्षीदारांना धमकावलं

या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीने न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर सोडलं तर ते पुन्हा तशा प्रकारचं कृत्य करु शकतात, 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी