Sanjay Raut arrest: शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुंबईतील निवासस्थानी सकाळीच ईडीचे अधिकारी दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्या घराची झाडाझडती आणि चौकशी झाल्यावर संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांच्यावर ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ९ तासांच्या चौकशीनंतर ही राऊत यांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Patra Chawl Land Scam case shiv sena leader sanjay Raut detained by ed)
मुंबईतील पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून त्या प्रकरणी संजय राऊत हे ईडीच्या रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि त्या प्रकरणी संजय राऊत यांना यापूर्वी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. २० जुलै रोजी ईडीने समन्स बजावले होते आणि त्यानंतर पुन्हा २७ जुलै रोजी ईडीने संजय राऊतांना समन्स बजावले. मात्र, लोकसभा अधिवेशनामुळे राऊत हे चौकशीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर आज (रविवारी ३१ जुलै) ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरी सकाळीच दाखल झाले.
#BreakingNews | सुबह से जारी पूछताछ के बाद ED ने संजय राउत को हिरासत में लिया- सूत्र@Shivani703 दे रही हैं पूरी जानकारी@JyotsnaBedi @spbhattacharya @jyotimishra999 @anchor_barkha#EDRaid #SanjayRaut #PatraChawlScam pic.twitter.com/3z7jrWoF1b — Times Now Navbharat (@TNNavbharat) July 31, 2022
#BreakingNow: कई घंटों की पूछताछ के बाद ED ने संजय राउत को हिरासत में लिया-सूत्र#EDRaid #SanjayRaut #PatraChawlScam pic.twitter.com/LIPMoimWR6 — Times Now Navbharat (@TNNavbharat) July 31, 2022
#WATCH Shiv Sena leader Sanjay Raut at his Mumbai residence as Enforcement Directorate conducts a raid there, in connection with the Patra Chawl land scam case pic.twitter.com/TnemlfgV1F — ANI (@ANI) July 31, 2022
मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रवीण राऊतांची मे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांचे पत्राचाळ पुनर्विकासाचे म्हाडासोबत कंत्राट. म्हाडा, भाडेकरूंसाठी फ्लॅट न बांधताच गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने ९ विकासकांना ९०१ कोटी रुपयांना एफएसआय विकला.
अधिक वाचा : Viral Audio : ७० सेकंदात शिव्यांचा पाऊस, टीम संजय राऊत कायदेशीर कारवाईच्या विचारात
पत्राचाळीत राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रवीण राऊत यांच्यावर आरोप आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार फ्लॅट बांधायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट भाडेकरूंना द्यायचे होते. तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते.
गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडून मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. फ्लॅट विकण्याच्या नावाखाली १३८ कोटी जमा केले. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली.
एकूण १०३९.७९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. १०० कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या अकाऊंटवर ट्रान्सफर करण्यात आले. प्रवीण राऊत यांनी ही रक्कम जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे हस्तांतरित केली. ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना दिल्याचं समोर आलं.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.