मुंबई पोलिसांनी बिग बॉसच्या या स्पर्धकाला ट्विटरवर केलं ब्लॉक 

मुंबई
पूजा विचारे
Updated Jul 11, 2019 | 21:59 IST

Mumbai Police And Big Boss: बिग बॉसची स्पर्धक पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केलं आहे. पायलनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर ट्विट केलं. त्यानंतर पोलिसांनी पायलला उत्तर दिलं आहे. 

Payal Rohatgi
मुंबई पोलिसांनी बिग बॉसच्या स्पर्धकाला ट्विटरवर केलं ब्लॉक  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • मुंबई पोलिसांनी बिग बॉसची स्पर्धक पायलला केलं ब्लॉक
  • पायलच्या मदतीसाठी अमृता फडणवीस यांची धाव
  • मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर

मुंबईः बिग बॉसची स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी नेहमीच आपले ट्विट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पायल काही प्रकरणावर स्वतःहून विचार करते आणि ते सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही असंच काहीसं झालं, ज्यावर पायलसोबत तिचे फॅन्सना देखील धक्का बसला आहे. पायल रोहतगीला मुंबई पोलिसांनी ब्लॉक केलं आहे. पायलनं स्वतः ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. 

पायलनं केलं होतं ट्विट

पायलनं एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. ज्यात दिसत होतं की मुंबई पोलिसांनी तिला ब्लॉक केलं आहे. त्यासोबतच पायलनं लिहिलं की, मला मुंबई पोलिसांनी ब्लॉक का केलं?  जर पोलिसच पक्षपातीपणा करत असतील तर एक हिंदू होण्याच्या नात्यनं मला भारतात रहायला भीती वाटते. आता मला समजलं की माझं कुटुंबिय मला हिंदूबद्दल बोलताना का थांबवतात. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं ट्विट 

त्यानंतर पायलनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांना ट्विट करून याबाबतची माहिती दिली. त्यासोबतच पायलनं या ट्विटमध्ये सांगितलं की, अभिनेता एजाज खाननं मला टाग्रेट करून एक व्हिडिओ बनवला होता. ज्यात त्यानं माझ्याबद्दल वाईट शब्दांचा वापर केला होता. पायलनं हा व्हिडिओ आपल्या व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत मुंबई पोलिसांना टॅग केला होता. हा व्हिडिओ पायलनं पोलिसांनी टॅग केला कारण त्यांनी यावर काही तरी कारवाई करावी अशी तिची मागणी होती. पायलनं या संपूर्ण घटनेची माहिती दिली होती. 

त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांनी ट्विट करत लिहिलं की, पायल एक नागरिक आहे. जी सोशल मीडियावर आपले पर्सनल व्ह्यूज ( जे कोणत्याही धार्मिक भावनांना दुखावत नाही आहे) मांडत आहे.  तिला कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक संस्था आणि संघटनाव्दारे ब्लॉक करू नये. मुंबई पोलीस तुम्ही पायल रोहतगीच्या या प्रकरणाची चौकशी करा. 

मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर 

दरम्यान याप्रकरणात मुंबई पोलिसांचं वेगळंच काही तरी म्हणणं आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देतं मुंबई पोलिसांनी लिहिलं की, मॅम, मुंबई पोलीस नेहमीच सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. पायल रोहतगीचं अकाऊंट एक्सेससाठी सुरू आहे. धोरण आणि अभ्यासाच्या रूपानं आम्ही कधीही कोणत्याही मुंबईकरांसोबत चर्चा करण्यासाठी प्रतिबंधित केलं नाही. आमची तांत्रिक टीम याची तपासणी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी