मुंबई : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेत घसघशीत विजयी मिळाविल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. जनताभिमुख सरकार स्थापन होते नाही तोपर्यंत संघर्ष सुरू राहील. ही परिवर्तनाची नांदी असल्याचेही मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
राज्यातील आमदार हे सरकारवर नाराज असल्याचे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. त्याचा प्रयत्य आज आला आहे. राज्यसभेत १२३ आमदारांचा पाठिंबा मिळाला होता. आता विधान परिषदेत १३४ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
कोणती मते फुटले हा तुमचा कयास आहे. मला माहिती आहे कोणी आम्हांला मदत केली. त्यामुळे सर्व पक्षांतील मदत केलेल्या आमदारांचे मी आभार मानतो, तसेच अपक्षांचेही आभार मानतो. आमचा संघर्ष हा सत्तेसाठी नाही. जनताभिमुख सरकार देण्यासंदर्भातील आहे, असेही फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव
विधान परिषदेच्या अत्यंत उत्कंठावर्धक निवडणुकीत काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपकडून राम शिंदे (३०), श्रीकांत भारतीय (३०), प्रविण दरेकर (२९) प्रसाद लाड (२८) आणि उमा खापरे (२७) मते मिळवून विजयी झाले. तर शिवसेनेचे आमशा पडवी (२६) आणि सचिन अहिर (२६) मते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर (२८) आणि एकनाथ खडसे (२९) काँग्रेसकडून भाई जगताप (२६) मते मिळवून विजयी झाले. चंद्रकात हंडोरे यांना २२ मते मिळाली. त्यामुळे ते पराभूत झाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.