private veterinary college महाराष्ट्रात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 17, 2021 | 18:44 IST

Permission to start a private veterinary college in Maharashtra महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

Permission to start a private veterinary college in Maharashtra
महाराष्ट्रात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी 
थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्रात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी
  • पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती
  • खासगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करणार

Permission to start a private veterinary college in Maharashtra । मुंबईः महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत राज्यात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्यातील पशु वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मर्यादित असून या माध्यमातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. खासगी क्षेत्रातील पशु वैद्यकीय पदवीधर उमेदवारांची वाढती मागणी लक्षात घेता खासगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करुन खासगी महाविद्यालये सुरु करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथील कुशल, अर्धकुशल व अकुशल रोजंदारी/ कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना कृषी विद्यापीठाकडून वर्ग करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे  नियमित करण्याकरिता  सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी