धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२५ अ चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

petition against dhananjay munde in high court
धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

थोडं पण कामाचं

  • धनंजय मुंडेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
  • धनंजय मुंडे प्रकरणी महिला एसपी चौकशी करणार, पवारांनी दिले संकेत
  • पोलीस चौकशी नंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार

मुंबईः महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा तसेच लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२५ अ चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आहे. ही मागणी करण्यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. पुण्यातील भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी याचिका केली आहे. याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयातून आदेश आले तर धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (petition against dhananjay munde in high court)

धनंजय मुंडे यांनी २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना पत्नी जयश्री यांच्यापासून झालेल्या दोन अपत्यांची माहिती दिली आहे. मात्र विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या दोन अपत्यांविषयी धनंजय मुंडे यांनी माहिती लपवली. तसेच विवाहबाह्य संबंध जपण्यासाठी आणि त्या संबंधांतून झालेल्या अपत्यांसाठी केलेल्या संपत्तीच्या तरतुदींविषयीची माहिती धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेली नाही. या प्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उमेदवारी अर्ज भरताना अर्धवट माहिती दिली म्हणून लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १२५ अ चे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

धनंजय मुंडे यांनी करुण शर्मा यांच्यावर २००६ पासून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप रेणू शर्मा यांनी केला. रेणू या करुणा शर्मा यांची बहीण आहेत. रेणू यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी विवाहबाह्य संबंधांची कबुली दिली. तसेच या संबंधांना पत्नीची मान्यता असल्याचेही जाहीर केले. पण राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांवर आरोप झाल्यामुळे राजकीय वादळ उठले. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना या संबंधांची आणि त्यातून झालेल्या अपत्यांविषयीची तसेच या अपत्यांच्या नावावरील संपत्तीची माहिती जाहीर केली नसल्याचा आरोप भाजपने केला. यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली. 

भाजपच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जाऊन प्रतिक्रिया दिली. आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, काँग्रेसमधून काही काळापूर्वीच भाजपमध्ये गेलेले कृष्णा हेडगे, मनसे नेते मनीष धुरी, रिझवान कुरेशी यांनी ब्लॅकमेलिंगची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे या प्रकरणात एसपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याकरवी चौकशी व्हावी, असे शरद पवार म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची माहिती  मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून शरद पवार यांनी जाणून घेतली. आरोपांची माहिती घेतल्यानंतर पवारांनी पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा केली आणि चौकशी पूर्ण झाल्यावर धनंजय मुंडे यांच्या संदर्भात पुढील निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले.

शरद पवार यांनी दिलेल्या माहितीमुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद आणखी काही काळ सुरक्षित आहे. मात्र भाजपच्या नेत्यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. तसेच मुंबईच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली आहे. यामुळे धनंजय मुंडे प्रकरणात पुढे काय होणार याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी