Petrol Diesel Rate : नऊ राज्यांनी स्वस्त केलं पेट्रोल-डिझेल; महाराष्टातील लोकांना मिळणार का दिलासा? सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 05, 2021 | 00:06 IST

Petrol Diesel Rate  : केंद्र सरकारने (Central Government) प्रति लिटर पेट्रोलमागे (Petrol) 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे (Diesel) 10 रुपये कमी केले आहेत.

Petrol Diesel Rate: Nine states make petrol-diesel cheape
राज्यातील लोकांनी मिळणार का दिलासा? सरकारच्या भूमिकेकडे लक्ष  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेल केलं स्वस्त
  • उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत.
  • पेट्रोलचे दर 50 रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा - संजय राऊत

Petrol Diesel Rate  : मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) प्रति लिटर पेट्रोलमागे (Petrol) 5 रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे (Diesel) 10 रुपये कमी केले आहेत. केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या आणि डिझेलवरच्या उत्पादन क्षुल्कामध्ये कपात केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत. आता राज्यानेही आपल्या व्हॅट करात कपात करावी असेही आवाहन केंद्राकडून करण्यात आले असून त्याला भाजपशासित (BJP ruled) नऊ राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परंतु आता महाराष्ट्र राज्यात अजून कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.  यामुळे राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. 

केंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत उत्तर प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, बिहार या भाजप शासित राज्यांनी त्यांच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे या व्हॅट कपात करण्याचा निर्णय घेतलेल्या नऊ राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, गुजरात आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या भाजप शासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट आहे. इंधन दर कपातीचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा विरोधक आरोप करत आहेत. 

केंद्र सरकारने आणि नऊ राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरच्या करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातही तशा प्रकारचा निर्णय घ्यावा अशी मागणी होताना दिसत आहे.दरम्यान, इंधन दरकपातीवरुन संजय राऊतांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. पोटनिवडणुकीतल्या भाजपच्या पराभवानंतर पेट्रोलचे दर 5 रुपयांनी कमी झाल्याचं राऊत म्हणालेत. तर पेट्रोलचे दर 50 रुपयांनी कमी करायचे असतील तर देशभरात भाजपचा पराभव करावा लागेल, असंही राऊत म्हणालेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी