Child Marriage : मुंबई : अल्पवयीन पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवणे हा गुन्हाच आहे असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. अल्पवयीन पत्नीशी शारिरीक संबंध ठेवल्याप्रकरणी आरोपीविरोधात बाल विवाह बंदी कायदा आणि पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासाठी आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. परंतु कोर्टाने त्याचा जामीन फेटाळला आहे,. २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने याबाबात निर्णय दिला होता. बालविवाहाबात कोर्टाने कुठलीही सबब ऐकूण घेण्यास नकार दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणीने एका बाळाला जन्म दिला. जेव्हा तिला तिचे वय विचारण्यात आले तेव्हा तिने आपले वय १७ सांगितले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांत या प्रकरणी बालविवाह आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल आणि पीडित तरुणीच्या नवर्याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. लग्नाच्या वेळी आपली बायको अल्पवयीन आहे हे आपल्याला माहित नव्हते असे कारण आरोपीने पुढे केले होते.
या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच २०१७ साली सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता त्याचा आधार घेण्यात आला आहे. बालविवाहात पीडिते वय १८ वर्षाच्या आत असेल तर यात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. पूर्वी वयोमर्यादा १५ वर्षे होती. नंतर २०१७ च्या निर्णयात वयोमर्यादा १८ वर्षे सांगण्यात आली. आपल्या पत्नीने शारिरीक संबंधांना विरोध केला नाही असा दावा आरोपीने केला होता. परंतु पीडितेचे वय १७ असून ती अल्पवयीन असल्याने कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच पीडित मुलगी विवाहित असो वा अविवाहित तिच्यावर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. पीडितेने आरोपीला जामीन देण्यास आपली हरकत नसल्याचे म्हटले होते. परंतु बालविवाहाबाबत सक्त कारवाई झाली पाहिजे असे मत कोर्टाने व्यक्त करून आरोपीला कुठलाही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.