दादर, पनवेलसह सहा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 09, 2021 | 17:57 IST

कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला.

Platform tickets suspended at Mumbai CSMT, Dadar, Kalyan Railway stations
दादर, पनवेलसह सहा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद 
थोडं पण कामाचं
  • दादर, पनवेलसह सहा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद
  • कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय
  • गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांची विभागणी तसेच इतर निर्बंध लावले जाऊ शकतात - वडेट्टीवार

मुंबईः कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सहा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आली आहे. Platform tickets suspended at Mumbai CSMT, Dadar, Kalyan Railway stations

गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांची विभागणी तसेच इतर निर्बंध लावले जाऊ शकतात. मात्र कोरोना संकट असले तरी रेल्वे सेवा बंद करणार नाही, असे महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी २ एप्रिल २०२१ रोजी सांगितले. यानंतर आठवड्याभराच्या अंतराने रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सहा रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद केली. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट दिसत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या १८ लाख होती. सध्या दैनंदिन प्रवासी संख्या १५-१६ लाखांवर आली आहे. तसेच मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरुन फेब्रुवारी २०२१ मध्ये दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ४० लाख होती. ही संख्या आता २० लाखांवर आली आहे. 

सध्या मध्य रेल्वेच्या रोजच्या ९० टक्के आणि पश्चिम रेल्वेच्या रोजच्या ९५ टक्के फेऱ्या सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद करणे हा आमचा शेवटचा पर्याय असेल; असे मदत व पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले.

महाराष्ट्रात ५ लाख २१ हजार ३१७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी मुंबईत ८३ हजार ६९३ ठाणे जिल्ह्यात ६९ हजार ९९३ पालघर जिल्ह्यात ६ हजार १५४ तर रायगड जिल्ह्यात ७ हजार ५६३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईची उपनगरीय रेल्वे प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या चार जिल्ह्यांमधून धावते. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने सहा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी