PMC Bank Account Holder Death: महाराष्ट्रात असलेली पंजाब अॅड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PMC शी संबंधित रोज नवीन बातम्या समोर येत असतात. मात्र सोमवारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेतल्या खातेधारकाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला आहे. या खातेधारकाचे जवळपास 90 लाख रूपये बँकेत जमा आहेत आणि याचाच धक्का घेतल्यानं खातेधारकाचा मृत्यू झाला.
संजय गुलाटी असं खातेधारकाचं नाव आहे. त्यांचे या बँकेत जास्त पैसे जमा होते. जवळपास 90 लाख रूपये त्यांच्या बँकेत फसले होते. ज्यामुळे ते खूप त्रस्त होते. संजय हे मृत्यू होण्याआधी बँक विरूद्ध केलेल्या आंदोलनातही सहभागी झाले होते. आंदोलन झाल्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
असं सांगितलं जातं आहे की, संजय गुलाटी जेव्हा आंदोलन करत होते त्यावेळी गुंतवणूक दारांकडे रडत रडत पैसे परत करण्यासाठी विनंती करताना दिसले. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना टेन्शन आलं आणि त्यातच त्यांची तब्येत खराब झाला. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
बँकेतून पैसे काढण्यावर बंदी असल्यानं ते खूप टेन्शनमध्ये होते. संजय गुलाटी यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुलं आहे. त्यातच बँकेच्या आधी संजय यांची नोकरी पण गेली होती आणि त्यांचे पैसे देखील बँकेत अडकले होते.
पंजाब अॅड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँक (PMC) संकटाक अडकली आहे. याआधी 14 ऑक्टोबरला रिझर्व्ह बँकेनं बँकेत्या ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा 25 हजारांपासून वाढून 40 हजार रूपये प्रति खातेधारक अशी केली होती. ही तिसरी संधी आहे जेव्हा केंद्रीय बँकेनं ग्राहकांना दिलासा देत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना पीएमसीच्या खातेधारकांच्या हितसंबंधांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांनी या संदर्भात ग्राहकांच्या हिताची काळजी घेण्याचे आश्वासन दिल्याचेही सीतारमण म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.