IIT Mumbai मधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण, पोलिसांना मिळाली चिठ्ठी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Mar 28, 2023 | 07:47 IST

Police said suicide note found at IIT Mumbai student Darshan Solanki room : पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या दर्शन सोळंकीच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Police said suicide note found at IIT Mumbai student Darshan Solanki room
IIT Mumbai मधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • IIT Mumbai मधील विद्यार्थ्याच्या आत्महत्येला नवे वळण
  • पोलिसांना मिळाली चिठ्ठी
  • दर्शनने 12 फेब्रुवारी रोजी केली होती आत्महत्या

Police said suicide note found at IIT Mumbai student Darshan Solanki room : पवई येथील आयआयटी मुंबईमध्ये शिकणाऱ्या दर्शन सोळंकीच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता वाढली आहे. पोलिसांना दर्शनच्या आयआयटी मुंबईतील खोलीत एक चिठ्ठी मिळाली आहे. या चिठ्ठीत एका विद्यार्थ्याचे नाव लिहून त्याने मला आत्महत्येस प्रवृत्त केले अशा स्वरुपाचा आरोप करण्यात आला आहे, यानंतर आत्महत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे काही मुद्यांचा नव्याने तपास सुरू केला आहे. 

दर्शनच्या खोलीत सापडलेल्या चिठ्ठीत अरमान खत्री नावाच्या विद्यार्थ्याने नाव आहे. अरमान खत्रीच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवत असल्याचे दर्शनच्या चिठ्ठीत नमूद आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

याआधी 12 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता दर्शनने आयआयटी मुंबईतील वसतीगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली होती. दर्शनने जातीय भेदभावातून आत्महत्या केल्याची चर्चा आयआयटी मुंबईमध्ये जोर धरू लागली होती. पोलिसांनी या दृष्टीने तपास केला. हा तपास सुरू असतानाच पोलिसांना दर्शनने आत्महत्येआधी लिहिलेली एक चिठ्ठी त्याच्या खोलीत सापडली. या चिठ्ठीमुळे तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वाढली आहे. 

अनेक विद्यार्थी संघटनांनी तसेच दर्शनच्या पालकांनी दर्शन सोळंकीच्या आत्महत्येप्रकरणी सखोल तपासाची मागणी केली होती. यानंतर दर्शन सोळंकीच्या आत्महत्येप्रकरणी सखोल तपासाकरिता एका विशेष तपास पथकाची (Special Investigation Team : SIT) स्थापना करण्यात आली. तपास सुरू असतानाच दर्शनच्या खोलीत चिठ्ठी मिळाली आहे. यामुळे आत्महत्या प्रकरणात नवी माहिती प्रकाशात येण्याची शक्यता आहे. 

परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी करा हे उपाय

टक्कल आणि केस गळण्याची समस्या टाळण्यासाठी पुरुषांसाठी नैसर्गिक तेल

बेलपत्र खाण्याचे फायदे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी