Shivshahir Babasaheb Purandare passed away | शिवशाहीरांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली, पंतप्रधान मोदी ते सुप्रिया सुळेंपर्यंत सर्वांनी व्यक्त केलं दु;ख

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 12:17 IST

Shivshahir Babasaheb Purandare passed away : मराठी साहित्यिक(Marathi litterateur), नाटककार, इतिहासकार (Historian) म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे आज पुण्यात (Pune) वृद्धापकाळाने निधन झाले.

Political leaders pay homage to Shivshahir
शिवशाहीरांच्या निधनावर राजकीय नेत्यांचं ट्विट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
  • शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने राजकीय विश्वातही दु:खद वातावरण
  • बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होतं.

Shivshahir Babasaheb Purandare passed away : पुणे : मराठी साहित्यिक(Marathi litterateur), नाटककार, इतिहासकार (Historian) म्हणून प्रसिद्ध असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांचे आज पुण्यात (Pune) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयाने (Dinanath Hospital) बाबासाहेबांच्या निधनाची माहिती अधिकृत केली आहे. आज सकाळी पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. 

शिवशाहीर बाळासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने राजकीय विश्वातही दु:खद वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) ते राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ नाव बळवंत मोरोपंत पुरंदरे होते. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला होता. त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी, आदराने त्यांना बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले जाऊ लागले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले. 'जाणता राजा' या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. 'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनिवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. 

राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत. तर पुरंदरे यांनी लिहिलेल्या जाणता राजा या महानाट्याचे राज्यभरात हजारो प्रयोग झाले. तब्बल 27 वर्षांत 1250 हून जास्त प्रयोग झाले. या नाटकाचे हिंदी आणि इंग्रजीसह इतर 5 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे.

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झालीये – पंतप्रधान मोदी

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाच्या बातमीने मन अत्यंत व्यथित झाले आहे – अमित शाह


शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 


मनाला अतिशय वेदना होत आहेत, त्यांच्या आठवणी डोळ्यापुढे येत आहेत – फडणवीस


महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – अजित पवार


महाराष्ट्राचे दैवत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जाणे अत्यंत वेदनादायी आणि दुःखद – नितीन गडकरी


आपण आमचे जीवन समृद्ध केलेत – संजय राऊत


नाट्यक्षेत्राशी संबंधित असणारे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड – सुप्रिया सुळे


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी