'मुख्य आरोपी बेपत्ता आहेत' तर अहवाल बनलाच कसा?, चित्रा वाघ आक्रमक

मुंबई
अजहर शेख
Updated Feb 19, 2021 | 19:49 IST

Chitra Wagh targeted the government: सत्ताधारी पक्षातील मोठे मोठे नेते सांगत आहेत की, संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. परंतु तुमच्या संपर्कात राहून काय करायचं त्यांनी जनतेच्या संपर्कात पाहिजे - चित्रा वाघ

pooja chavan sucide case, Chitra Wagh targeted the government
'मुख्य आरोपी बेपत्ता आहेत' तर अहवाल बनलाच कसा'  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मुख्य आरोपी बेपत्ता आहेत – चित्रा वाघ
  • संजय राठोड यांची चौकशी न करता अहवाल अहवाल सादर झालाच कसा?
  • भारतीय जनता पार्टीतील नेते आक्रमक होत राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर (pooja chavan suicide case) राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी मंत्री संजय राठोड (minister sanjay rathod) यांना पूजा चव्हाणच्या आत्महत्येचा जबाबदर धरले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भारतीय जनता पार्टीतील नेते आक्रमक होत राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, सदर प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारकडे आणि महिला आयोगाकडे पाठवला आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड यांची चौकशी न करता अहवाल अहवाल सादर झालाच कसा? किंवा अहवाल बनलाच कसा? असा सवाल त्यांनी उपस्थित केलां आहे.

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यापासून भाजपने त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यात चित्रा वाघ तर पिछा सोडायला तयार नाहीत. चित्रा वाघ यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की, ज्या १२ ऑडीओ क्लिप आहेत, ज्यामध्ये संजय राठोड यांनी जी दोन कथित मुलं होती, एक अरुण राठोड आणि दुसरा विलास त्यांच्याशी केलेल्या संभाषनामध्ये आत्महत्येला परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर ‘दरवाजा तोड पण मोबाईल घे’ इतपर्यंतचं जे संभाषण १२ ऑडीओ क्लिपमध्ये झालय. आणि संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवाल बनूच शकत नाही. त्यामुळे जो काही चौकशी अहवाल आला आहे. त्याला काही अर्थ नाही असं चित्रा वाघ म्हणाल्या.

मुख्य आरोपी बेपत्ता आहेत – चित्रा वाघ

दरम्यान पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की, मुख्य आरोपी जो आहे त्याची चौकशीचं झाली नाही किंबहुना तो बेपत्ता आहे. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की, सत्ताधारी पक्षातील मोठे मोठे नेते सांगत आहेत की, संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. परंतु तुमच्या संपर्कात राहून काय करायचं त्यांनी जनतेच्या संपर्कात राहील पाहिजे. मात्र, ते तर बेपत्ता आहेत. सर्वजण शोधत आहेत, परंतु कुठेच संजय राठोड मिळून येत नाही आणि जर तुमच्या संपर्कात असतील तर तुम्हीच त्यांना संपर्कात ठेवणार का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामध्ये प्रत्येक नेता असं सांगतो की, ते निर्दोष आहेत. जर ते निर्दोष असतील तर त्यांनी समोर येऊन सांगावं असं देखील चित्रा वाघ म्हणाल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी