भाजप उद्या करणार राज्यभर चक्काजाम आंदोलन, तर १ मार्चला उग्र आंदोलनाचा इशारा

मुंबई
अजहर शेख
Updated Feb 26, 2021 | 19:39 IST

pooja chavan sucide case,BJP will launch Chakkajam agitation :भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही? असा सवाल केला

pooja chavan sucide case,BJP will launch Chakkajam agitation
भाजप उद्या करणार राज्यभर चक्काजाम आंदोलन  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • भाजपा ओबीसी मोर्चा ३ मार्चला आसूड आंदोलन करणार आहे
  • राजीनामा घेतला नाही तर, महिला मोर्चातर्फे राज्यभर चक्काजाम आंदोलन – उमा खापरे
  • रोठोडांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात महाविकासआघाडी सरकारमध्ये (mahavikas aghadi goverment) मंत्री असलेले संजय राठोड (sanjay rathod) यांचे नाव समोर आल्याने भाजपने (bjp) हा मुद्दा हाती घेत पूजा चव्हाण (pooja chavan) आत्महत्या (sucide) प्रकरणात उडी घेतली आहे. दरम्यान, भाजपने आक्रमक पावित्रा घेत राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या भाजप महिला मोर्चाचे चक्का जाम आंदोलन केले जाणार असून, येत्या १ मार्चला उग्र आंदोलनाचा इशारा भाजपतर्फे दिला आहे.

भाजपा ओबीसी मोर्चा ३ मार्चला आसूड आंदोलन करणार 

दरम्यान, सदर प्रकरणात भाजपा ओबीसी मोर्चा देखील सहभागी होत ३ मार्च रोजी आसूड आंदोलन करणार आहे. पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर भाजपाने संजय राठोड याचा राजीनामा मागितला होता. मात्र, राठोड यांनी अद्यापपर्यंत हा राजीनामा दिला नसल्यामुळे कारवाईसाठी भाजपच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.

राजीनामा घेतला नाही तर महिला मोर्चातर्फे राज्यभर चक्काजाम आंदोलन 

भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमा खापरे यांनी पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची राज्य सरकार चौकशी करणार आहे की नाही? असा सवाल केला आहे. याप्रकरणी भाजपतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी पूजाच्या मृत्यूची चौकशीची घोषणा तातडीने केली नाही आणि संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर, महिला मोर्चातर्फे राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जाईल असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. उद्या शनिवारी २७ फेब्रुवारीला हे आंदोलन केले जाणार असल्याचे त्या बोलल्या आहेत.

पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तींची पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही

दरम्यान, पुढे खापरे म्हणाल्या की, पोलीस हाताची घडी, तोंडावर बोट ठेवून गप्प बसले आहेत. पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवादावरून संबंधित व्यक्तींची पोलिसांनी साधी चौकशीही केलेली नाही. याचा अर्थ पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे असं देखील खापरे म्हणाल्या. पूजा चव्हाणचा ७ फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाच्या मृत्यूला १९ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक माहिती अहवालही दाखल केला नाही असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

रोठोडांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप चांगलीच आक्रमक झाली असल्याचे समोर आले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनाम तात्काळ घ्यावा. जर राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू, असेही खापरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी