Mahavitaran Strike latest news : महावितरण (Mahavitaran) कंपनीच्या खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप (Strike) पुकारला आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेले आहेत. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी मिळाली तर कर्मचारी आणि ग्राहकांना खर्चात लोटण्याचा प्रकार असेल त्यामुळे परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी (employees)केली आहे. (possibility of power outage in the state; Toll Free Number issued by Mahavitran)
अधिक वाचा : भारत-श्रीलंका पहिला T20 सामना, पीच रिपोर्ट,हवामान परिस्थिती
दरम्यान वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारच्या या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरातील बत्ती आजपासून गुल होण्याची शक्यता आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. याद्वारे महावितरण कंपनी अदानी समूहाला विकली जाणार असल्याच्या समजुतीवरुन हा संप पुकारण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात (भांडुप ते मुलुंड सोडून) सध्या अदानी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट आणि टाटा पॉवर या तीन कंपन्यांकडून समांतर वीज वितरण केले जाते. भांडुपपासून पुढे संपूर्ण ठाणे जिल्हा, नवी मुंबई, पालघर, रायगड या परिसरात महावितरणची वीज आहे.
अधिक वाचा : रितेश अन् जेनेलियाच्या 'वेड' सिनेमाने सर्वांना लावलं याड
यामधीलच तळोजा औद्योगिक वसाहत क्षेत्र, प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, संपूर्ण नवी मुंबई, ठाणे शहर, मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र यामध्ये समांतर वीज वितरणासाठी परवाना मिळावा यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. हा अर्ज म्हणजे महावितरण कंपनीचे खासगीकरण होत असल्याचा आरोप कर्मचारी वर्गाने केला आहे.
अधिक वाचा : BJP MLA Laxman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
या खासगीकरणाच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघर्ष समिती यांनी या तीन दिवसीय संपाची हाक दिली आहे. या संपात मध्ये राज्य सरकारी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तिन्ही कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांशी संबंधित 24 संघटना या समितीत आहेत. ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’नेही (सिटू) या संपाला पाठिंबा दर्शवला आहे.
समाजमाध्यमांवर महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समितीने नागरिकांना आव्हान करणारी पोस्ट केली आहे. काय आहे पोस्ट -
सर्व विद्युत ग्राहकांना विनंती त्यांनी आपले मोबाईल चार्ज करून ठेवावेत. पाण्याच्या टाक्या भरून घ्याव्यात. दळण दळून घ्यावेत .कारण
4,5,6 जानेवारी 2023 ला संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप तुम्हाला त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध होय. नक्कीच हे तीन दिवस त्रासदायक होतील.
पण आम्ही दिलगीर आहोत. हा संप फक्त ग्राहकांकरिता आहे.उदा BSNL बुडण्यापूर्वी GIO फुकटात आजीवन सिम ,जास्त स्पीड चा भरपूर डेटा पॅक देत होतं आज कमी स्पीड चा डेटा पॅक ला 700 रुपये मोजावे लागतात . उद्या मोबाईलच्या रिचार्ज प्रमाणे विजेचे दर सामान्य ग्राहकाला परवडणारे राहणार नाहीत. त्यासाठी काही भांडवलदार आसुसलेले आहेत. त्यांचे विरोधातील हा संप आहे. काही ग्राहक सेवेमुळे दुखावलेले असतील ,वसुल्यामुळे नाराज असतील पण सार्वजनिक उद्योग टिकला पाहिजे तो कोणताही का असेना. वीज ही रोजच्या वापरातील सर्वांना हवी असणारी वस्तू आहे ती उद्या खाजगी भांडवलदाराच्या हातात गेल्यास भविष्यातील दरवाढ ग्राहकाला मुळीच परवडणारी नसणार करिता हा संप आहे.
पुन्हा एकदा क्षमस्व
तर्फे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समिती
वीज वितरण कर्मचारी संपाचा फटका पुण्यातल्या विविध भागांत बसलेला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये बत्ती गुल झालीय. शिवणे, सन सिटी, वडगाव सिंहगड रोड परिसरात लाईट बंद झाली आहे.
वीज गेल्यास ग्राहकांसाठी टोल फ्री क्र :1800-212-3435/1800-233-3435/19120
ठाणे मंडळासाठी ग्राहक मोबाइल क्र : 9930269398,
वाशी मंडळासाठी ग्राहक मोबाइल क्र. : 9920491386
(नियंत्रण कक्ष) व 887935501/9930025104 पेण मंडळासाठी ग्राहक मोबाइल क्र. : 7875765510
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.