सावधान! लॉकडाऊन लागू शकतो ; महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर : आरोग्य मंत्री

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 29, 2021 | 11:58 IST

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोना (corona update ) संसर्ग (Infection) आटोक्यात आल्याचं बोललं जात असताना, आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्याही 2 हजारांच्याही पुढे गेल्याचे दिसून आले आहे.

 third wave of corona in Maharashtr
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मंगळवारी राज्यातील 2,172 कोविड प्रकरणांपैकी 63.3% मुंबईत होते.
  • जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
  • आर्थिक राजधानीत दररोज कोविड-19 ची संख्या 1,134% ने वाढली आहे.

मुंबई :  Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. महाराष्ट्रातील (maharashtra) कोरोना (corona update ) संसर्ग (Infection) आटोक्यात आल्याचं बोललं जात असताना, आता पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात महाराष्ट्रात आढळलेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्याही 2 हजारांच्याही पुढे गेल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे

मागील दीड महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात 2 हजारांहून जास्त रूग्ण आढळले असून, यामुळे यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यात मुंबईत सील इमारतींची संख्या दोन दिवसांत दुप्पट झाली आहे. एकट्या मुंबईत मंगळवारी 1,333 रुग्णांची नोंद झाली, एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या 809 संसर्गाच्या तुलनेत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 26 मे पासूनची ही सर्वाधिक वाढू असून 1,352 प्रकरणांची नोद करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त कोविडबाधीत आढळले तर इमारत सील केली जात आहे. अंधेरी पश्चिम आणि ग्रँटरोड भागात सर्वाधिक इमारती सील झाल्या आहेत. 25 डिसेंबरपर्यंत 17 इमारती सील होत्या पण तर आता ही संख्या 37 झाली आहे.

मंगळवारी राज्यातील 2,172 कोविड प्रकरणांपैकी 63.3% मुंबईत होते. शहरात घेण्यात आलेल्या 32,369 चाचण्यांपैकी 1,333 पॉझिटिव्ह होत्या, ज्यामुळे पॉझिटिव्ह रेट 4.11% वर गेला. गेल्या 28 दिवसांत, आर्थिक राजधानीत दररोज कोविड-19 ची संख्या 1,134% ने वाढली आहे. सक्रिय प्रकरणे 1,904 वरून 5,803 वर गेली आहे. जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे.कारण अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात 24 तासांत 2 हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईचा आकडाही 1 हजारांपलीकडे गेला आहे. राज्यात 2 हजार 172 तर मुंबईत 1 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जरी बहुतेक रूग्ण हलके लक्षणे असलेले असले तरी डॉक्टरांनी सूचित केले की अचानक वाढ होण्याचे श्रेय संभाव्य तिसरी लाट किंवा ओमायक्रॉन या नवीन प्रकाराच्या समुदायामध्ये पसरल्यामुळे असू शकते.राज्य कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी म्हणाले, “तिसर्‍या लाटेच्या अंदाजाची पुष्टी करण्यासाठी आणखी दोन आठवडे लागतील. परंतु असे काही साथीचे घटक आहेत जे प्रकरणांमध्ये वाढ करण्यास कारणीभूत आहेत. मुंबईत सेरोचा प्रसार जास्त आहे, परंतु व्हेरियंट हा डेल्टा डेरिव्हेटिव्ह नाहीये पण दुसरा प्रकार आहे. लोकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे तो चिंतेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासांत 50 टक्के रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईतही संख्या तब्बल 70 टक्क्यांनी वाढलीय. वाढलेल्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत दिले आहेत. तसंच जानेवारी आणि फेब्रुवारीत रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यताही राजेश टोपेंनी वर्तवलीय. तर लवकरच तिसरी लाट येणार असल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केली.

रूग्णवाढीने गांभीर्य वाढतेय

महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी ट्विट करून राज्यातल्या रूग्णवाढीच्या गांभीर्याकडे लक्ष वेधले आहे. पहिल्या लाटेत रुग्णवाढ डबलिंग होण्यात 12 दिवस लागले होते. तर दुसऱ्या लाटेत 20 दिवस लागले. मात्र, चिंतेची बाब म्हणजे तिसऱ्या लाटेत फक्त चारच दिवसात रुग्ण डबलिंग झालेत...यामुळे आतापासूनच काळजी घ्या आणि नियम पाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी