वीज दरवाढीचा शॉक?प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 27, 2023 | 14:09 IST

राज्यातील नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढत असताना वीजदर वाढणार आहेत. पुढील महिन्याच्या 1  तारखेपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

Electricity price hike; It is likely to be expensive by Rs 2.50 per unit
वीज दरवाढ; प्रति युनिट अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शुक्रवारी 31 मार्च रोजी वीज नियामक आयोग याबाबतचा आदेश जारी करणार आहे.
  • पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता
  • वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई केली जात आहे.

मुंबई : राज्यातील नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानाचा पारा वाढत असताना वीजदर वाढणार आहेत. पुढील महिन्याच्या 1  तारखेपासून वीज जवळपास अडीच रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग येत्या शुक्रवारी (31 मार्च) विजांच्या दरनिश्चितीबाबतचा आदेश जारी करणार आहे.

अधिक वाचा  : IAS टीना डाबीची छोटी बहीण रियाची कमाई वाचून येईल चक्कर
 
 महावितरणसह खासगी वीज कंपन्यांनी सादर केलेल्या वीज दर निश्चितीच्या याचिकेवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर (MERC)जनसुनावणी पार पडली. शुक्रवारी 31 मार्च रोजी वीज नियामक आयोग याबाबतचा आदेश जारी करणार आहे. राज्यात नवे वीजदर 1 एप्रिलपासून लागू करावे लागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नियामक वीज आयोगाचे वीज दराचे आदेश तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्याच्या अखेरच्या दिवशी आयोग आपला आदेश जारी करणार आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  
 अधिक वाचा  : ऑफिसमधील सहकाऱ्यासह प्रेम जुळणं आहे धोक्याचं

महावितरण, ग्राहक संघटनेचे वेगवेगळे दावे

महावितरणने 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांसाठी 67 हजार कोटी रुपयांच्या महसुलाची मागणी केली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या वीजेच्या दरात प्रतियुनिट अडीच रुपयांची वाढ होणार असल्याचा दावा ग्राहक संघटनांनी केला आहे. परंतु एक रुपयांची वाढ केली जाऊ शकते असं प्रशाशनाने सांगितले आहे. दरम्यान महावितरणचे संचालक विश्वास पाठक यांनी सांगितले की, तूट भरण्यासाठी 2023-2024  आणि 2024 -2025 या दोन आर्थिक वर्षात दरवर्षी 14 आणि 11 टक्के दरवाढ झाली हवी.

अधिक वाचा  : कोणत्या राशींवर महादेवाची राहील कृपा; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

ही वाढ एक रुपयांच्या जवळपास आहे.  परंतु प्रशासनाने एक रुपयाच वाढणार असल्याचं वाटत असले तरी ही दरवाढ प्रतियुनिटसाठी अडीच रुपये होणार असल्याचं ग्राहक संघटनेने म्हटलं आहे. वीज नियामक आयोगाने महावितरणचा प्रस्ताव मान्य केल्यास वीजेचा दर 2023-24 मध्ये 8.90  रुपये, तर 2024-25 मध्ये 9.92 रुपये होणार आहे. म्हणजेच वीजेचे दर प्रतियुनिट अनुक्रमे 1.11 रुपये आणि 2.13 रुपयांनी वाढणार आहेत. तर वीज शुल्काचा भार पकडून ही वाढ 2.55 रुपयांपर्यंत होणार असल्याचा दावा राज्य वीज ग्राहक संघटेनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. 

वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई 

 वीजबिल थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात कारवाई करत 9 हजार 71 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी