मुंबई : गणेश विसर्जनाच्या (Immersion of Ganesh) मिरवणुकीनंतर प्रभादेवी (Prabhadevi)परिसरात शिंदे गट (Shinde group) आणि ठाकरे गटातील (Thackeray group) कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यावेळी बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती.ही गोळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांच्याच बंदुकीत निघाली होती असा अहवाल बॅलेस्टिक तज्ज्ञांनी दिला आहे.त्यामुळे सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Prabhadev clashes : the bullet was fired from Saravankar's own gun, ballistic report)
अधिक वाचा : खासदार प्रफुल्ल पटेल क्रिकेटच्या प्रेमात
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता. सदा सरवणकर यांच्या जवळील बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती. त्यावेळी सदा सरवणकर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आता बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती, ती सरवणकरांच्याच बंदुकीत सुटल्याचं समोर आलं आहे. बॅलेस्टिक अहवाल समोर आल्यानंतर पोलीस आता सदा सरवणकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार, ते पाहावे लागेल.
अधिक वाचा :भारतातील पहिल्या विमान निर्मात्याकडे शासनाचे दुर्लक्ष
दरम्यान पोलिसांनी गोळीबार प्रकरणी तपास करत असताना घटनास्थळावरुन काडतूसं आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासले होते.बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे की, जप्त केलेली काडतूसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने जुळले आहेत. त्यामुळे सरवणकर यांच्या अडचणींत भर पडली आहे. गणपती विसर्जनादरम्यान डिवचल्याच्या रागातून एकमेकांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाली.दादर पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात 15 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर संघर्ष टळला होता. परंतु शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सदा सरवणकर समर्थकांकडून शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर शाब्दिक बाचाबाचीही झाली. त्यादरम्यान सदा सरवणकर यांनी आपल्याकडील बंदुकीचा धाक दाखवला होता. त्याच दरम्यान गोळी झाडणअयात आली होती.
अधिक वाचा : माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते सुपर कम्युनिस्ट
यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. सरवणकर यांनी गोळी झाडण्यात आली नव्हती असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळून लावले होते. सप्टेंबर महिन्यात घडलेल्या या प्रकारानंतर पोलिसांनी जवळपास 25 शिवसैनिकांना ताब्यात घेतले होते. यानंतर ठाकरे गट प्रचंड आक्रमक झाला होता. ठाकरे गटाचे नेते दादर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. तेव्हा अरविंद सावंत यांनी सदा सरवणकर यांनी बंदुकीतून झाडलेली गोळी पोलीस कर्मचाऱ्याला लागणार होती, असा दावा केला होता.
सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले होते. गोळीबार केल्यानंतरही सरवणकर यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही असा आरोप ठाकरे गटातील आमदारांनी त्यावेळी केला होता.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.