Mumbai Bank Election : 21 का 21 पास ! प्रवीण दरेकर यांच्या सहकार सर्व पॅनेल विजयी, मुंबई बँक निवडणुकीत दरेकर यांचे वर्चस्व

मुंबई
भरत जाधव
Updated Jan 03, 2022 | 13:21 IST

Mumbai Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनंतर (Sindhudurg District Bank) भाजपच्या नेत्यांनी मुंबई बँक निवडणुकीत (Mumbai Bank elections) घसघसीत यश मिळवलं आहे. मुंबई बँक निवडणुकीत भाजप आमदार (BJP MLA) प्रवीण दरेकर  (Praveen Darekar) यांच्या पॅनेलचे (Panel) एकहाती वर्चस्व राहिले.

Praveen Darekar's co-operation wins all panels in Mumbai Bank elections
मुंबई बँक निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.
  • भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल 4 हजार मते मिळाली
  • मुंबईतील सहकारी चळवळीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला - दरेकर

Mumbai Bank Election : मुंबई :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेनंतर (Sindhudurg District Bank) भाजपच्या नेत्यांनी मुंबई बँक निवडणुकीत (Mumbai Bank elections) घसघसीत यश मिळवलं आहे. मुंबई बँक निवडणुकीत भाजप आमदार (BJP MLA) प्रवीण दरेकर  (Praveen Darekar) यांच्या पॅनेलचे (Panel) एकहाती वर्चस्व राहिले. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व 21 जागांवर विजयी झाले आहेत. यातील 17 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरीत चार जागांची मतमोजणी आज पार पडली. या मतमोजणीत (Vote Counting) दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार (Candidate) विजयी झाले आहेत.  

विरोधी पक्षनेते व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेल मधील महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री ताई पांचाळ ,मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातुन विठ्ठलराव भोसले , प्रायमरी कन्जुमर संस्था मतदार संघातुन पुरषोत्तम दळवी तर एन टी (NT) मतदार संघातुन अनिल गजरे विजयी झाले आहेत.  मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 मतं तर सुखदेव चौगुले यांना 16 मतं मिळाली.

प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मते तर कमलाकर नाईक यांना 59 मते मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना 332 मते तर, शालिनी गायकवाड यांना 188 मते मिळाली. भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल 4 हजार मते मिळाली तर,  यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली.  

प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली.

मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.  दरम्यान, आपले सर्व पॅनल विजयी झाल्याने दरेकर यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील सहकारी चळवळीतील लोकांनी मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवला असल्याने हा विजय मिळाला असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने बँकेचा विकास होत आहे. त्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाले असल्याचे दरेकर यांनी म्हटले. 

बिनविरोध विजयी झालेले १७ उमेदवारांची नावे

नागरी सहकारी बँक

संदीप सीताराम घनदाट
आ.प्रविण यशवंत दरेकर
पगारदार सहकारी संस्था
आ.प्रसाद मिनेश लाड

नागरी सहकारी पतसंस्था
शिवाजीराव विष्णू नलावडे
  
गृहनिर्माण संस्था
आ.सुनील राजाराम राऊत
अभिषेक विनोद घोसाळकर

मजुर सहकारी संस्था
आ.प्रविण यशवंत दरेकर
आनंदराव बाळकृष्ण गोळे

औद्योगिक सहकारी संस्था
सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे
विष्णू गजाभाऊ घुमरे

इतर सहकारी संस्था
नंदकुमार मानसिंग काटकर
जिजाबा सीताराम पवार

व्यक्तिगत (वैयक्तिक)
सोनदेव बाळाजी पाटील
महिला राखीव मतदार संघ
शिल्पा अतुल सरपोतदार
कविता प्रकाश देशमुख
अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
विनोद दामू बोरसे
इतर मागासवर्गीय मतदार संघ
नितीन धोंडीराम बनकर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी