President Ram Nath Kovind Visit to Raigad : राष्ट्रपती रायगडाला 'या' दिवशी देणार भेट, संभाजीराजेंनी ट्वीट करून दिली माहिती

मुंबई
भरत जाधव
Updated Nov 25, 2021 | 10:53 IST

President Ramnath Kovind Raigad Visit : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला(Raigad) भेट देणार आहेत. खासदार (member of parliament) संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ही माहिती ट्विटरद्वारे(Twitter) दिली आहे.

President will visit to Raigad on this day
राष्ट्रपती रायगडाला 'या' दिवशी देणार भेट  |  फोटो सौजन्य: BCCL

President Ramnath Kovind Raigad Visit :मुंबई :  देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला(Raigad) भेट देणार आहेत. खासदार (member of parliament) संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी ही माहिती ट्विटरद्वारे(Twitter) दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, "राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे."
खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची रायगड भेट ही गौरवास्पद बाब असल्याचे खासदार संभाजीराजेंनी नमूद केले आहे. 

दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या खासदारांसह 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान, संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी