मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न करता आपला जुना मित्र असलेल्या भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याची बंडखोर खासदारांनी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बंडखोर आमदारांमध्ये त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं. राज्यातील राजकीय घडामोडी सुरू असतानाच आता शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी करणारं पत्र शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.
सध्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या घडामोडीं दरम्यान आता शिवसेनेतील खासदारांकडूनही भाजपसोबत जुळवून घेण्याची मागणी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी ही एक पत्र लिहिलं होतं. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या या पत्राबाबत अद्याप तरी शिवसेनेकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र, राहुल शेवाळे यांच्या या पत्रामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपसोबत जुळवून घेण्याचा दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे.
पक्षप्रमुख, शिवसेना.
विषय: दि. १८ जूलै २०२२ रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणूकीत मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत...
आदरणीय उद्धवसाहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !!!
दिनांक १८ जूलै २०२२ रोजी देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. हया पदासाठी मा. श्री. यशवंत सिन्हा आणि मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू हे दोन उमेदवार उभे आहेत. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवाासी समाजातील असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे बहुमुल्य योगदान आहे. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या राज्याच्या राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी शिक्षिका म्हणून सुरुवात केली व त्यानंतर अरोबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट, सयंगपूर येथे सहाय्यक प्रबंधक म्हणून कामगिरी बजावली आहे. या नंतर त्या ओडीसा सरकारच्या सिंचन विभागात कनिष्ठ सहायक या पदावर कार्यरत होत्या. मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून महत्वाची कामगिरी सुध्दा पार पाडलेली आहे.
आदिवासी समाजातील सक्षम आणि कतृत्त्ववान महिला म्हणून शिवसेनेने भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार श्रीमती #द्रौपदी_मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी लेखी मागणी माझ्या वतीने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.@murmuu_draupadi @OfficeofUT pic.twitter.com/wBEY0VQLVB — Rahul Shewale - राहुल शेवाळे (@shewale_rahul) July 5, 2022
वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती असताना एन.डी.ए. च्या उमेदवाराला पाठिंबा न दर्शविता मा. श्रीमती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्रातील असल्याकारणाने त्यांना पाठिंबा दर्शविला होता. तसेच मा. श्री प्रणव मुखर्जी यांना देखील वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला होता.
मा श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची पार्श्वभूमी व सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता माझी आपणास नम्र विनंती आहे की, आपण मा. श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दयावा व तसे आदेश सर्व शिवसेनेच्या खासदारांना द्यावेत,
धन्यवाद,
आपला स्नेहांकित,
राहुल रमेश शेवाळे खासदार
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.