Nawab Malik : मराठी मनोरंजनसृष्टीत दबाव तंत्र सुरु आहे, हे योग्य नाही, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया

Nawab Malik राजकीय भूमिका मांडल्याने स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मलिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे असे सांगण्यात येत आहे. यावर मराठी मनोरंजनसृष्टीत दबावतंत्र सुरू आहे हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • मुलगी झाली हो मलिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे,
  • मराठी मनोरंजनसृष्टीत दबावतंत्र सुरू आहे.
  • भाजपची लोक आणि त्यांचे समर्थक मराठी पाट्यांचा विरोध करत आहेत.

Nawab Malik : राजकीय भूमिका मांडल्याने स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मलिकेतून किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. असे सांगण्यात येत आहे. यावर मराठी मनोरंजनसृष्टीत दबावतंत्र सुरू आहे हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. तसेच राज्य सरकारने मराठी पाट्यांबद्दल जो निर्णय घेतला आहे, त्याला भाजपचे समर्थक विरोध करत आहेत हे योग्य नाही असेही मलिक म्हणाले. 

गोव्यात स्वबळाचा विचार

पाच राज्यांच्या निवडणुक चालु असताना राष्ट्रवादी काँग्रेस तीन ठिकाणी निवडणुक लढणार आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. मणिपूर मध्ये राष्ट्रवादीची काँग्रेस सोबत आघाडी झाली आहे. मणिपुरीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी सोबत एक जागेचा निकाल दिलेला असून गोव्यात अजुन कुठलाअही निर्णय झालेला नाही. कदाचित गोव्यात राष्ट्रवादीला स्वबळावर लढावे लागेल असे मलिक म्हणाले. 


मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र

अभिनेता किरणं माने यांना राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून काढून टाकले आहे. त्यांच्यावर आरोप आहे की  एका राजकीय पक्षाच्या विरोधात ते लिखाण करत होते त्या मुळे त्यांना मालिकेतून काढल आहे. मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र  सुरु आहे, हे योग्य नाही. स्टार प्रवाह या वाहिनीने पुन्हा विचार करून कुणाच्याही दबावाखाली दडपण आणून हे होत असेल तर योग्य नाही असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.

मराठी पाट्या बंधनकारक

राज्य सरकारने दुकानदारांना मराठी पाटी बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. काही विशेष वर्गाची लोक याचा विरोध करत आहेत हे योग्य नाही. काही भाजपची लोक आणि त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठी पाट्यांचा विरोध करत आहे हे योग्य नाही असेही मलिक म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी