MPSC: पीएसआय परीक्षेसाठी मागील वर्षाचं नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र राहील ग्राह्य

मुंबई
भरत जाधव
Updated Mar 15, 2023 | 23:57 IST

पोलीस उपनिरीक्षकाच्या (Sub-Inspector of Police) मुलाखतीसाठी (interview) सामोरे जाणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची गोष्ट आहे. 2021 आणि 2022 या वर्षात अनेक तरुणांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती आणि मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना एक कागदपत्र लागणार आहे.  उमेदवारांचं मागील वर्षाचं नॉन क्रिमिलेअर (Non-Criminal) ग्राह्य धरलं  जाणार आहे.

Previous year non criminal certificate will be accepted for PSI exam
PSI परीक्षेसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची मर्यादा वाढली  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर ग्राह्य धरले जाणार आहे.
  • बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.
  • 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं.

Police Recruitment: पोलीस उपनिरीक्षकाच्या (Sub-Inspector of Police) मुलाखतीसाठी (interview) सामोरे जाणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची गोष्ट आहे. 2021 आणि 2022 या वर्षात अनेक तरुणांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती आणि मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना एक कागदपत्र लागणार आहे.  उमेदवारांचं मागील वर्षाचं नॉन क्रिमिलेअर (Non-Criminal) ग्राह्य धरलं  जाणार आहे. 

मुलाखतीसाठी 2021-2022 या वर्षाचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर आता 2021-2022 मध्ये काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 या वर्षांमध्ये शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या होत्या आणि त्यामध्ये 2020-21 या वर्षांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोना असल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर हे प्रमाणपत्र काढता आलं नव्हतं. त्यामुळे 2021आणि 2022 या वर्षात काढलेलं नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

अधिक वाचा  : पोरं झाल्यानंतर नवरा-बायकोचं नातं कसं घट्ट बनवणार

महाराष्ट्र राज्यपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल 8 हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्यपात्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परीक्षा घेतली जाईल. तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2023 शनिवारी 9 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. 

अधिक वाचा  : 2023 मधील नववधूंसाठी दागिन्यांचे ट्रेंड

विविध मंत्रालय प्रशासकीय विभागात भरती 
 

सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर ग्रह विभागाचे पोलीस उपनिरीक्षक 374 पदे भरली जातील. यांचा पगार 38 हजार 600 ते एक लाख 22800 रुपयांपर्यंत असेल. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. 

अधिक वाचा  :मासिक पाळीच्या दरम्यान खाऊ नका ही फळं​

या पदासाठी पगार 32 हजार ते एक लाख एक हजार 600 रुपये इतका असेल. वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असेल..  यांचा पगार 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपये इतका असेल. वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे या पदासाठी पगार 25500 ते 81100 रुपये इतका असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी