Schools Starts : राज्यात आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळेची घंटा वाजली

मुंबई
भरत जाधव
Updated Jun 15, 2022 | 10:35 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरू होतील म्हणजे आजपासून विद्यार्थ्यांना शिकवण सुरू होणार आहे. तसे पाहिले तर शाळा 13 जूनपासून सुरू झाल्या आहेत.

 Schools in the state start from today
राज्यात आजपासून शाळा सुरू   |  फोटो सौजन्य: Shutterstock
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांना कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं.
  • शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं.

Schools Starts : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरू होणार आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरू होतील म्हणजे आजपासून विद्यार्थ्यांना शिकवण सुरू होणार आहे. तसे पाहिले तर शाळा 13 जूनपासून सुरू झाल्या आहेत, परंतु विद्यार्थ्यांना आज म्हणजेच आज 15 जून रोजीपासून प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावे, असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं. 

आजपासून शाळा सुरू

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. परंतु याचा शाळांवर आणि विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग (Online School) भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहत होती. 

15 जून रोजी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत बोलावलं

शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं होतं. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटले होते. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगानं प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटले होते.  

राज्यातील शाळा सुरू करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. आदेशात शैक्षणिक सत्र 2022-23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत. शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी