Samruddhi Mahamarg: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणारा समृद्धी महामार्ग आहे तरी कसा; का होतेय इतकी चर्चा

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 11, 2022 | 08:23 IST

Maharashtra Samruddhi Mahamarg: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. मोदी यांच्या हस्ते नागपूर - शिर्डी (Nagpur - Shirdi) या रस्त्याचे लोकार्पण होईल. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

Prime Minister Modi inaugurated Samruddhi Mahamarg
आज समृद्धी महामार्गाचं लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्ये  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
 • समृद्धी महामार्गाची का होतेय चर्चा
 • नागपूर आणि मुंबईमधील अंतर अवघ्या सात तासात कापले जाणार आहे.
 • मोदी यांच्या हस्ते नागपूर - शिर्डी या रस्त्याचे लोकार्पण होईल.

Maharashtra Samruddhi Mahamarg: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.  या महामार्गामुळे राज्याचे दोन राजधान्या(capital) जवळ येणार आहेत. नागपूर आणि मुंबईमधील (Nagpur and Mumbai) अंतर अवघ्या सात तासात कापले जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या महामार्गाचे उद्धाटन करणार असल्याने ते आज नागपूर दौऱ्यावर असणार आहे. समुद्धी महामार्ग असं नाव असलेला महामार्ग खरंचं समृद्ध आहे का नाही हे आपण जाणून घेऊ.. दरम्यान या समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय आहेत? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ( Prime Minister Modi inaugurated Samruddhi Mahamarg; why so much talk about Samriddhi Highway?) 

अधिक वाचा  : अमित शहा दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. मोदी यांच्या हस्ते नागपूर - शिर्डी (Nagpur - Shirdi) या रस्त्याचे लोकार्पण होईल. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमस्थळी जाऊन तयारीचा आढावा घेतला. समृद्धी महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो.

अधिक वाचा  : ट्रान्सजेंडर व्यक्तीही पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करू शकणार

समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय?

 • 701 कि.मी.चा मार्ग
 •  नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण झाला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  त्याचे लोकार्पण करणार आहेत. 
 •  उर्वरित 181 कि.मी. पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे. 
 •  हा महामार्ग 3 अभयारण्यातून जाणार. काटेपुर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये, म्हणून अंडरपास करण्यात आलाय. असे एकूण 209 अंडरपास मार्ग काढण्यात आले आहेत. 
 • प्रकल्पासाठी लागलेला खर्च : 55,355 कोटी
 • सहा पदरी असणार मार्ग/150 कि.मी. वेगाने वाहन क्षमता
 • प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार
 • देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना, मुख्यमंत्री असतानाच केले काम सुरू करण्यात आले. 
 • सर्वाधिक गतीने पूर्ण झालेले भूसंपादन : 8800 हेक्टर जागा अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन करण्यात आले. यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले.
 • फडणवीस आमदार असतानापासून नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचे होते स्वप्न. प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यावरच ते साकार करता आले.
 • या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने लक्ष दिले आहे. त्याकाळी स्थापन मुख्यमंत्री वॉर रुमचा सुद्धा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प. दर टप्प्याला आणि गतिमान आढावा घेतला जात होता. त्यामुळेच अल्पावधीत हा प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य.

अधिक वाचा  : हुश्श, भारत तिसरी वन डे जिंकला, बांगलादेशचा दारुण पराभव

समुद्धी महामार्ग असा करेल समृद्ध 

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नाव आहे. या महामार्गामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षणीय स्थळं जोडण्यास हा महामार्ग उपयुक्त ठरेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाची आखणी केलीय. हा महामार्ग नागपूर, मुंबई आणि संभाजीनगर या प्रमुख बाजारपेठेला जोडला जाईल.

 • राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ
 • 10 जिल्ह्यातील, 26 तालुक्यातील 391 गावातून जाणार
 • ट्राफिक सर्व्हिलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्री टेलिफोन बुथ प्रत्येक 5 कि.मी. अंतरावर असणार आहे. 
 • 17 तास प्रवासाचे अंतर 7 तासांवर येणार
 •  देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग, 11 लाख वृक्ष दोन्ही बाजुंनी असणार आहे. 
 • संपूर्ण राज्यासाठी विकासाचे नवे दालन खुले होणार
 • 14 जिल्हे पोर्टने जोडले जाणार
 • शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. 
 • या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा/20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार आहे. 
 • 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणार
 • या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात 1000 नवीन शेततळी/चेकडॅम्स उभारले जाणार
 • या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार
 • या संपूर्ण महामार्गाभोवती आर्थिक गतिविधीमुळे लाखो रोजगार निर्माण होणार

कसा असेल पंतप्रधान मोदींची दौरा 

 • सकाळी 9.25 - नागपूर विमानतळ आगमन
 • सकाळी 9.40-- रस्ते मार्गाने रेल्वे स्थानकावर आगमन
 • सकाळी 9.45 ते 9.55 --वंदे भारत एक्सप्रेस Flagging off 
 • सकाळी 10.00-- फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथे आगमन
 • सकाळी 10.10 -- मेट्रो प्रदर्शनाची पाहणी -आणि मेट्रो सफर
 • सकाळी 10.20- खापरी मेट्रो स्थानाकावर आगमन
 • सकाळी10.30-- खापरी मेट्रो स्टेशन. मेट्रोच्या दोन मार्गांचे लोकार्पण
 •  सकाळी 10.45 -- समृद्धी महामार्ग आरंभबिंदू समृद्धी झिरो माईल पॉईंटवर आगमन 
 • सकाळी 10.45 ते 11.00  । समृद्धी महामार्गावर दहा किलोमीटरचा प्रवास व महामार्गाचे लोकार्पण
 • सकाळी 11- रस्ते मार्गाने मिहानकडे प्रस्थान
 • सकाळी 11.15 ते 11.25 - मिहान एम्स येथे आगमन व एम्सचे औपचारिक उद्घाटन
 • सकाळी 11.30 - टेम्पल ग्राउंड एम्स सार्वजनिक कार्यक्रम व नव्या प्रकल्प उद्घाटन
 • दुपारी 12.35 - नागपूर विमानतळाकडे प्रस्थान
 • दुपारी 12.55 - नागपुरातून विमानाने गोव्यासाठी प्रस्थान

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी